तरुण भारत

दिवाळीसाठी नरकासूर मुखवटे, आकाश कंदिल विक्रीस आलेल्या विक्रेत्यांकडून स्विकारले 2500 रु.

प्रतिनिधी / म्हापसा

म्हापसा मार्केटमध्ये दिवाळीसाठी आजूबाजूचे नागरिक नरकासूर मुखवटे, आकाश कंदिल घेऊन म्हापसा बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूला विक्रीस आले असता म्हापसा पालिकेने त्यांच्याकडून जबरदस्तीने 2500 रु. शुल्क आकारल्याने दरवर्षीप्रमाणे अवघ्या दोन दिवसांसाठी विक्रीस आलेल्या स्थानिक नागरिकांना पालिकेला भूखंड द्यावा लागला असल्याने येथे ऐन कोविड काळात कसा व्यवसाय करावा असे म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. हंगामी स्टॉल्स उभारण्यासाठी प्रशासकांनी दुप्पट शुल्क आकारल्याने अनेकजण नाराज झाले आहे. पूर्वी हेच शुल्क रु. 1200 होते ते आता 2500 रु. करण्यात आले आहे.

Advertisements

आकाश कंदिल तयार करून बाजारात विकणाऱया कलाकारांना हा नाहक जादा भूखंड भरावा लागत आहे. कागदी आकाशदिवे करण्यासाठी तीन चार महिने सतत काम करावे लागते आणि चार दिवसात ते विकायचे असतात. त्यांना विक्रीसाठी  दि. 10 नोव्हेंबरच्या दुपारी सुरुवात करून रविवार दि. 15 नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. दिवाळीच्या दुसऱया दिवशी आकाश कंदिल विक्री होईल का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. प्रशासकांनी चुकीचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. सध्या म्हापसा पालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने पालिका निरीक्षक येथे दादागिरीची भाषा करीत असल्याचा आरोप येथील व्यापारी वर्ग करीत आहे. पालिका निरीक्षक विकास कांबळी यांच्याकडे याबाबत विक्रेत्यांनी विचारणा केली असता त्यांनी हा आदेश प्रशासकीय अधिकाऱयांचा असल्याने आम्ही याबाबत काहीच करू शकत नाही असे कांबळी यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कला मंदिरच्या ऐतिहासिक नाटय़स्पर्धेचा पडदा उघडला

Amit Kulkarni

‘मौळेचा राजा : श्री बाल गणेश’ उत्सवाची 25 रोजी सांगता

Amit Kulkarni

महिला काँग्रेसकडून मडगावात वाढीव वीजबिलांचा निषेध

Patil_p

परप्रांतीय मजुरांचे लसिकरण होणे गरजेचे

Amit Kulkarni

मडगाव न्यू मार्केट बंद ठेवणार नाही

Amit Kulkarni

काँग्रेसच्या फुटीर आमदारांना मत मांडण्यास दोन आठवडय़ांची मुदत

Patil_p
error: Content is protected !!