तरुण भारत

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 57 लाख 49 हजार 007 वर

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 


ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 57 लाख 49 हजार 007 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 63 हजार 406 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements


बुधवारी ब्राझीलमध्ये 47 हजार 724 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 564 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 57.49 लाख कोरोनाबाधितांपैकी 50 लाख 64 हजार 344 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 5 लाख 21 हजार 257 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 2 कोटी 20 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 


दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 07 लाख 08 हजार 728 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 47 हजार 398 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा तर ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो.

Related Stories

असा बेरोजगार तुम्ही पाहिला नसेल

Patil_p

नेपाळचे पंतप्रधान ओली बरळले

Patil_p

डोक्यापासून पायापर्यंत केवळ ’टॅटू’च

Patil_p

युक्रेनमध्ये सैन्यविमान कोसळले

Patil_p

ड्रॅगनची लोकसंख्या पोहचली 1.41 अब्जांवर

datta jadhav

आयसीसीकडून यूएईच्या दोन खेळाडूंचे निलंबन

datta jadhav
error: Content is protected !!