तरुण भारत

बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये अद्यावत मशिनरी

प्रतिनिधी / कोल्हापूर

निम्म्या शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱया बालिंगा पंपिंग स्टेशन लवकरच कात टाकणार आहे. या पंपिंग स्टेशनमध्ये अद्यावत माशिनरी बसविण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. व्हर्टिकल टर्बाईन पंप आणि सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असून वीजेच्या बचतीबरोबर महापुरासारख्या आपत्कालिन स्थितीतही शहराच्या पाणी पुरवठÎावर वितरीत परिणाम होणार नाही. स्थायी समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या पुढाकाराने नवीन यंत्रणा बसविण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

बालिंगा पंपिंग स्टेशनमधील मशिनरी गेली वीस वर्षे बदलण्यात आलेली नाही. निधी नसल्याने केवळ देखभाल, दुरूस्ती आणि नादुरूस्त पार्टस् बदलून काम सुरू आहे. गतवर्षी 2019 मध्ये अतिवृष्टी आणि महापूर आल्यानंतर बालिंगा पंपिंग स्टेशन पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. त्यावेळी जुनी मशिनरी असल्याचा आणि सबमर्सिबल पंप नसल्याचा फटका कोल्हापूरवासियांना बसला. जवळपास आठ दहा दिवस पंपिंग स्टेशनपाण्याखाली गेल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला होता. त्यावेळी महापालिकेच्या अधिकारी आणि नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामारे जावे लागले होते. या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेतून प्रयत्न झाले. त्यात विद्यमान स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी अर्बन डेव्हलमेंट स्किममधून आलेल्या निधीचा विनियोग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी तज्ञांचा सल्ला घेऊन जुनी मशिनरी बदलण्याबरोबर अद्ययावत मशिनरी वापरण्याचे निश्चित केले. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर कामाला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी जलअभियंता नारायण भोसले, रामचंद्र गायकवाड, जयेश जाधव, मोहन धामणे आदी कार्यरत आहेत.

Advertisements

नागदेववाडीचे पंपिंग स्टेशन होणार बंद

बालिंगा पंपिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याबरोबर विकसित करताना नागदेववाडीतील पंपिंग स्टेशन, जॅकवेल बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणी असणारी मशिनरी आणि कर्मचारी बालिंगा पंपिंग स्टेशनकडे पाठविले जाणार आहेत. नागदेववाडीचे स्टेशन बंद केल्याने 15 ते 20 टक्के वीज बिलाची बचत देखील होणार आहे.

अशी असणार नवीन मशिनरी आणि कामे

300 हॉर्सपॉवरचा व्हर्टिकल टर्बाईन पंप मोटरसह उभारणार
-300 हॉर्सपॉवर सबमर्सिबल पंप मोटरसह उभारणार
-मेन पॅनेल बोर्ड व स्टार्टर पॅनेलची उभारणी
-11 केव्ही ब्रेकर बे उभारणी करणार
-नागदेववाडी जॅकवेलकडील पंपसेंट बालिंगा रॉ वॉटर पंपिंग स्टेशनकडे स्थलांतरीत होणार
-750 केव्ही ए ट्रान्सफॉर्मरची उभारणी

निम्म्या शहराला लाभ

बालिंगा पंपिंग स्टेशनमधून ए वॉर्डात 50 टक्के, बी वॉर्डात 40 टक्के, सी वॉर्डात 100 टक्के, डी वॉर्डात 100 टक्के आणि ई वॉर्डात काही भागात पाणी पुरवठा केला जातो. आता यात सुरळीतपणा येणार आहे. कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा वेगवान होण्यास मदत होणार आहे.

गेली वीस वर्षे बालिंगा पंपिंग स्टेशनची जुनी मशिनरी बदलली नव्हती. आता अद्यायवत मशिनरी बसविण्यात येणार असल्याने आपत्कालिन स्थितीतही कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार नाही.
-सचिन पाटील, स्थायी समिती सभापती

Related Stories

वारणा दुध संघाच्या कर्मचाऱ्यांची गुजरातच्या आनंद दूध प्रकल्पास भेट

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर गोकुळ शिरगाव कचरामुक्त

Abhijeet Shinde

गुजरीत फोटोवरून मागितली 5 लाखांची खंडणी, तिघांवर गुन्हा

Abhijeet Shinde

वातावरणातील बदलाचा आरोग्यवर परिणाम

Sumit Tambekar

कोल्हापूर शहर पूरबाधित भागात बहुतांश `एटीएम’ बंदच

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हा बँक : शिवसेनेचा काडीमोड, जाहीर केले नवे पॅनेल

Sumit Tambekar
error: Content is protected !!