तरुण भारत

पंजाब : कोरोना रुग्णांची संख्या 1.40 लाखांच्या उंबरठ्यावर

  • आतापर्यंत 1 लाख 30 हजार 018 रुग्ण कोरोनामुक्त! 


ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 692 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 39 हजार 869 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 1,39,896 रुग्णांपैकी 1 लाख 30 हजार 018 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 412 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 28 लाख 22 हजार 668 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 439 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 134 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 17 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

भविष्यातील आरोग्य व्यवस्थापनात आयुर्वेदाला महत्वाचे स्थान : श्रीपाद नाईक

pradnya p

मृत्यूदर 1 टक्क्याखाली आणा !

Patil_p

शिवसेना नेत्याची गोळय़ा घालून हत्या

Patil_p

उत्तरप्रदेशातील मिर्ची गँगच्या म्होरक्याला मुंबईत अटक

datta jadhav

लखनऊ : भाजप नेते संजय सिंह यांना तात्काळ बंगला खाली करण्याचे आदेश

pradnya p

यंदा मंत्र्यांनी नवी वाहने खरेदी करू नये : योगी आदित्यनाथ

datta jadhav
error: Content is protected !!