तरुण भारत

काँग्रेसने सन्मानाने जनादेश स्वीकारावा : रवी

बेंगळूर/प्रतिनिधी

विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. दरम्यान पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरण्याऐवजी कॉंग्रेसने मतदारांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री सी. टी. रवी यांनी म्हंटले आहे. त्यांनी कॉंग्रेसचा विजय झाल्यावर कॉंग्रेसने देशातील भाजपाविरोधी लाटविरोधात युक्तिवाद केला, परंतु जेव्हा त्यांचा पराभव झाला, तेव्हा सत्तेचा दुरुपयोग आणि पैशाच्या बळामुळे भाजपचा विजय झाला असा आरोप केला जातो. असे ते म्हणाले. तसेच कॉंग्रेसमध्ये सत्य स्वीकारण्याची हिम्मत नाही, असेही ते म्हणाले.

आज सत्तेचा गैरवापर करून आणि पैशाच्या मदतीने निवडणुका जिंकल्याचा आरोप करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी पोटनिवडणुकांच्या प्रचाराची आठवण करावी लागेल. मतदारांकडे जनादेशाचा मुद्दा मागितला गेला, परंतु कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि खासदार डी. के. सुरेश यांनी या निवडणुकीत जातीवादाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला मतदारांनी अचूक उत्तरे दिली आहेत. या विजयामुळे हे स्पष्ट झाले आहे की जाती-आधारित राजकारण आता शक्य नाही.

Related Stories

कर्नाटकातील १५ लिंगायत आमदार मुख्यमंत्री होण्यास पात्र

Shankar_P

बेळगावसह 5 जिल्हय़ांमध्ये प्रायोगिक टप्प्यात ‘स्वामित्व’

Patil_p

भाजपचे १५ आमदार बंडाच्या पावित्र्यात

Shankar_P

वृत्तांकनासाठी प्रसारमाध्यमांना विधानपरिषदेत निर्बंध नाही

Amit Kulkarni

बेंगळूर: सिद्धरामय्या यांची डी.जे. हळ्ळी, आ. मूर्ती यांच्या निवासस्थानी भेट

triratna

बेंगळूर आणि इतर जिल्ह्यात यलो अलर्ट

Shankar_P
error: Content is protected !!