तरुण भारत

नलीनी जहाज प्रकरणात गुंतलेल्या अन्य संशयीतांविरूध्द कारवाई व्हावी

प्रतिनिधी/ वास्को

नु शी नलीनी नाफ्तावाहू जहाज प्रकरणी एमपीटी आणि हे वादग्रस्त जहाज मुरगाव बंदरात आणणाऱया सुत्रधारावर कारवाई करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी मुरगाव हार्बर येथील सागरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली असून जहाजाचे मालक आणि त्यांच्या कंपनीबरोबरच एमपीटी आणि हे जहाज मुरगाव बंदरात आणणारा प्रमुख सुत्रधारही या प्रकरणाला तेवढाच जबाबदार असल्याचे आमोणकर यांनी म्हटले आहे.

Advertisements

मागच्या वर्षी नाफ्तावाहु नु शी नलीनी हे जहाज मुरगाव बंदरातून भरकटत दोनापावला येथील किनाऱयावर जाऊन रूतले होते. त्यानंतर इंधन गळतीच्या भितीने गोवाभर खळबळ माजली होती. सदर वादग्रस्त जहाज अपघातात सापडले होते व ते पाकिस्तानातून भारतात आलेले होते. या प्रकरणी मागच्या महिन्यात सदर जहाजाचे मालक व त्यांच्या कंपनीच्या इतर संबंधीत व्यक्तींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. मात्र, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी मालकावर आरोपपत्र दाखल करणे योग्य असल्याचे स्पष्ट करून या प्रकाराला तीतकेच जबाबदार असलेल्यांविरूध्दही कारवाई होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी एमपीटीला दोष दिलेला असून मंत्री मिलिंद नाईक यांच्याविरूध्दही संशय व्यक्त केला आहे. एमपीटीने त्या जहाजाला मुरगाव बंदरात बेकायदा प्रवेश दिलेला आहे. राजकीय दबावाखलीच हा प्रकार घडला होता. 2300 टन नाफ्ता असलेल्या त्या जहाजात नाफ्ता नव्हे तर स्लॅज असल्याचे मंत्र्यांनी म्हटले होते असे स्पष्ट करून त्या जहाजाला मुरगाव बंदरात आणणारा सुत्रधार कोण याचा शोध घेण्यात यावा. बेकायदा प्रवेश देणाऱया एमपीटी व्यवस्थापनाविरूध्द तसेच मास्टरमाईण्डविरूध्द कारवाई करण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी योग्य कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र आपलाच सहकारी या प्रकरणात अडकेल या भितीपोटीच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा शब्द पाळलेला नाही. या जहाजातील नाफ्ता दुबईला पाटवण्यात आला. मात्र, त्याचे पैसे कुणला मिळाले याचा उलगडा झालेला नाही. ते जहाज अखेर भंगारात काढून विकण्यात आले. या भंगाराचे पैसे कुणा कुणाला मिळाले याचाही उलगडा झालेला नाही.

त्यामुळे जहाजाच्या मालकाशिवाय अन्य कोण कोण यात गुंतलेले आहेत. त्यांचीही चौकशी व्हावी व त्यांच्यावर कायदय़ानुसार कारवाई व्हायला हवी अशी मागणी संकल्प अमोणकर यांनी केली आहे. गुरूवारी दुपारी आपल्या मुरगावच्या कार्यकर्त्यांसह आमोणकर यांनी मुरगाव हार्बर येथील सागरी पोलीस स्थानकात जाऊन या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली.

Related Stories

बायणा किनाऱयावर उत्तर भारतीयांच्या प्रचंड गर्दीत छट पुजा उत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

विजयश्री’ पुस्तकाचे प्रकाशन

Amit Kulkarni

गोवा सरकारला ‘सर्वोच्च’ दणका

Amit Kulkarni

अडचणीत असलेल्या 80 सुवर्ण कारागिरांना आर्थिक साहाय्य

Omkar B

पोलीस खात्यात वरिष्ठांकडून स्वार्थी डावपेच

Amit Kulkarni

सर्वपक्षीय सल्लागार समितीची स्थापना करा : गोवा फॉरवर्ड

Patil_p
error: Content is protected !!