तरुण भारत

केएसआरटीसी महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी अ‍ॅप विकसित करणार

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने केएसआरटीसी बसमधून प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन लवकरच सेवेत आणले जाईल असे म्हंटले आहे. कायदा आणि संसदीय कार्यमंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी हे अ‍ॅप्लिकेशन निर्भया प्रकल्पांतर्गत विकसित केले जाईल आणि यामध्ये पॅनिक बटणाचा पर्याय, बससाठी जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम, बसच्या वेळापत्रकांची सविस्तर माहिती आणि राज्यभरातील ५०० बसस्थानकांचा तपशील देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

सुमारे ५ हजार बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. केएसआरटीसीच्या ३ हजार महिला कर्मचार्‍यांनाही आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाईल. केंद्र सरकारच्या निर्भया प्रकल्पांतर्गत ते राबविण्याचा संपूर्ण खर्च ६०:४० असा केला जाईल असे मधुस्वामी म्हणाले.

Advertisements

Related Stories

उच्च न्यायालयात जाण्याचा परमबीर सिंग यांना सल्ला

Patil_p

भाजपच्या पराभवासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे

Patil_p

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन ते तीन दिवसांत निर्णय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

लॉकडाऊनच्या काटेकोर पालनासाठी पोलीस अधिकाऱयांचे जीवाचे रान

Patil_p

एकीने लढूया कोरोनाला हरवूया

Patil_p

बार्शीतील कासारी येथे रेशन मोफत धान्य वाटले नसल्याची तक्रार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!