तरुण भारत

टायर चोरीप्रकरणी दोघांना अटक

पेडणे / (प्रतिनिधी )

आगरवाडा येथील गॅरेजमध्ये कार दुरुस्तीसाठी आणलेल्या कारांचे टायर चोरी केल्या प्रकरणी दोघांवर पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली. त्यांच्याकडून  टायर ताब्यात घेतले.

Advertisements

   पेडणे दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार आगरवाडा येथील राकेश यादव यांनी आपल्या भावाच्या गॅरेजमधील ओली व्हिल असलेले 10 टायर चोरीला गेल्याची तक्रार पेडणे पोलीस स्थानकात दिली होती. पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक जीवबा दळवी यांनी उपनिरीक्षक हरिश वायंगणकर, उपनिरीक्षक संजित कांदोळकर पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कोरगावकर, सचिन गावस व विनोद पेडणेकर यांची एक टिम तयार करून या चोरीचा छडा लावण्यासाठी पाठविली.  सीसीटिव्हीच्या सहाय्याने एक आयटेन कार क्रमांक जीए 03  आर 0166 मध्ये हे टायर नेल्याचे पोलिसांनी समजले. त्यानुसार पेलिसांनी गजानन अंकुश कुबल (वय 27, रा. करासवाडा बार्देश व ज्ञानदीप ज्ञानेश्वर महाले (वय 22, रा. माडेल थिवी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर चोरीचा गुन्हा नोंद करत अटक केली.

Related Stories

शैक्षणिक वर्षाचा निर्णय 15 जुलैनंतर

Omkar B

भाजप पदाधिकाऱयांनी बोलवित्या धन्यापासून सावध रहावे

Patil_p

प्रदेश भाजप एसटी मोर्चा अध्यक्षपदी प्रभाकर गांवकर

Omkar B

लॉबेरा आयएसएलची शील्ड आणि चषक जिंकणारे पहिले प्रशिक्षक

Patil_p

भाऊसाहेब समाधी स्थळाच्या देखभालीबाबत सरकार उदासीन !

Amit Kulkarni

मुरगाव पोलिसांकडून चोरीचा छडा, चौघांना अटक

Omkar B
error: Content is protected !!