तरुण भारत

राज्यात जमीन रुपांतरणाचा सपाटा

मंत्री बाबू कवळेकर आघाडीवर, काँग्रेस प्रवक्ते टुलियो डिसोझा यांचा आरोप

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

राज्य सरकारने सध्या जमीन रुपांतरणाचा सपाटा लावला असून शहर आणि नगर नियोजन खात्याचे मंत्री बाबू कवळेकर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे संगनमताने ही रुपांतरणे करत आहेत. या सरकारने गोवा विक्रीस काढला असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते टुलियो डिसोझा यांनी केला आहे.

पणजीत काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विद्यमान सरकारने चालविलेली जमीन रुपांतरणे पाहता मंत्री कवळेकर यांनी या खात्याचे माजीमंत्री विजय सरदेसाई यांनासुद्धा मागे टाकले आहे, अशी टीका त्यांनी केली. या खात्याद्वारे राज्यातील डोंगर, शेती, खाजन अशा सर्वच जमिनी रुपांतरीत करण्यात येत असून पेडणे तालुक्यात तर 8 हजार चौ. मी. क्षेत्रफळाचा विकास प्रतिबंधक असलेला एक डोंगरकडाही रुपांतरीत करण्यात आला आहे. सदर जमीन गोवा पर्यटन विकास महामंडळासाठी रुपांतरीत करण्यात आली असल्याचा दावा डिसोझा यांनी केला.

अशाप्रकारे डिसेंबर 2019 पर्यंत राज्यातील लाखो चौ. मी. क्षेत्रफळाच्या शेकडो जमिनी रुपांतरीत करण्यात आल्या असून त्यातील बहुतेक या खाजगी कंपन्यांसाठी तर काही सरकारी प्रकल्पांसाठी वापरात आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हे सर्व व्यवहार गुपचूप करण्यात येत असून जनतेच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी कधीतरी एखाद दुसऱया रुपांतरणाची छोटीसी जाहिरात एखाद्या दैनिकात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे डिसोझा म्हणाले. नगरनियोजन खात्यात अनेक तज्ञ व वरिष्ठ अधिकारी असतानाही प्रत्येक फाईल मंत्र्याला पाठवावी लागते हा प्रकारच अनाकलनीय असून मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय हे होऊच शकत नाही, असे सांगून हे बेकायदेशीर प्रकार त्वरित बंद करावे, असे डिसौझा म्हणाले. नगर नियोजन खात्याप्रमाणेच उद्योग, पर्यटन या खात्यातही मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून राज्यातील रियल इस्टेट व्यवसाय पार कोलमडला आहे. राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना तर त्यांच्या एकूण बजेटमधील 8 टक्के निधी हा केवळ लाच देण्यासाठी राखीव ठेवावा लागतो, अशी माहिती ’क्रेडाय’ या संघटनेच्या गोव्यातील एका अधिकाऱयाने आपल्याला दिल्याचे डिसोझा यांनी सांगितले. यावरून भ्रष्टाचार कुठल्या थरापर्यंत पोहोचलेला आहे याची कल्पना येते, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस त्यांच्यासोबत निलेश गोम्स हेही उपस्थित होते.

Related Stories

प्रवास सागरच्या चित्रकलेचा

Patil_p

कोरोनाबाधितांची संख्या 12 वर

Patil_p

आपने वीज आंदोलनाद्वारे प्रत्येक गोंयंकराच्या हृदयाला स्पर्श केला

Amit Kulkarni

गोवा डेअरीच्या आर्थिक स्थितीबाबत दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवू नका

Patil_p

जि.पंचायतीसाठी बेतकी खांडोळय़ात रंगणार तिरंगी लढत

Omkar B

मांद्रे येथे वाहनाला अपघात

Amit Kulkarni
error: Content is protected !!