तरुण भारत

सत्ता सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी दिला चीनला धक्का

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता सोडण्यापूर्वी चीनला मोठा धक्का दिला आहे. चिनी कंपन्यांमधील अमेरिकेच्या गुंतवणूकीवर बंदी घालण्याचा आदेश ट्रम्प प्रशासनाने जारी केला असून, 11 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. 

Advertisements

चीन अमेरिकेचे भांडवल आपल्या लष्करी, गुप्तचर आणि अन्य सुरक्षा एजन्सींच्या मजबुतीकरणासाठी अनेक वर्षे वापरत आहे. यापुढे असे होऊ नये, म्हणून ट्रम्प प्रशासनाने चिनी सैन्यांशी जोडल्या गेलेल्या चिनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला. 

ट्रम्प प्रशासनाच्या आदेशानुसार, संरक्षण विभागाने चिनी सैन्य-समर्थित कंपन्या म्हणून संबोधित केलेल्या 31 चिनी कंपन्यांचे शेअर्स अमेरिकन संस्था आता खरेदी करणार नाहीत. चायना टेलिकॉम कॉर्पोरेशन लिमिटेड, चायना मोबाईल लिमिटेड या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे.

Related Stories

…तर मोदी सरकार तुम्हाला देईल पाच हजारांचे बक्षीस

datta jadhav

अमेरिकन एअर फोर्सचे एफ-15 सी फायटर विमान समुद्रात कोसळले

datta jadhav

केरळमधील लॉकडाऊनमध्ये 30 मे पर्यंत वाढ : मुख्यमंत्री पिनराई विजयन

Rohan_P

गौतम गंभीर दोन वर्षांचे वेतन सुपूर्द करणार

Patil_p

पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे ; ठाकरे सरकारचा निर्णय

Abhijeet Shinde

केंद्राला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील – राहुल गांधी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!