तरुण भारत

बेंगळूर: एनसीबीने हॅश ऑइलची तस्करी करणाऱ्या ३ जणांना केली अटक

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) युनिटने शहरात गुरुवारी केरळमधील तीन जणांना आंध्र प्रदेशातून हॅश तेलची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली. उत्तर बेंगळूरमधील देवनहळ्ळी टोलगेटजवळ आरोपी प्रवास करीत असलेल्या केरळला जाणाऱ्या वाहनाला एजन्सीने रोखल्यानंतर त्यांच्याकडून २५ लाख रुपयांहून अधिक किमतीचे ३ किलो हॅश तेल जप्त करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅश ऑईल तपकिरी रंगाच्या पॅकेटमध्ये भरलेले होते आणि ड्रायव्हरच्या आसनाखाली लपलेले होते. यावेळी रणजित आर. एस., अनंत पी. डी. आणि सारंग के. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौकशीदरम्यान या तिघांनी कबूल केले की, ही औषधे बेंगळूर आणि केरळमध्ये विक्रीसाठी आणले होते. विशाखापट्टणममधील त्यांच्या संपर्कांवरून हे तेल घेण्यात आले होते.

Advertisements

Related Stories

राज्याचा निकाल 99.999 टक्के

Amit Kulkarni

कर्नाटक: शुक्रवारी दिल्लीला जाणार- मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Shinde

राज्यात दिवसभरात 23,558 नवे रुग्ण रुग्ण

Amit Kulkarni

कर्नाटक: मंत्री सुधाकर यांच्या कोरोना बाबतीत अधिकाऱ्यांना सूचना

Abhijeet Shinde

सभा-समारंभांसाठी नियम आणखी कठोर

Patil_p

शुल्क भरले नाही म्हणून ऑनलाईन वर्ग बंद करू नका!

Patil_p
error: Content is protected !!