तरुण भारत

शाहीर शरद यादव पोवाडा गायन स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम


सातारा / प्रतिनिधी

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग जि.सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन पोवाडा गायन स्पर्धेत जि.प. शाळा नागेवाडी ता. वाई येथील प्राथमिक शिक्षक शाहीर शरद यादव यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला.त्यांच्या साथीला प्राथमिक शिक्षक अनिल जाधव, राजेन्द्र नलावडे व सचिन पवार होते. ढोलकी वादक विश्वनाथ कांबळे, हार्मोनियमची साथ राजेंद्र पंडित यांनी दिली.शाहीर यादव यांनी यापूर्वी पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त झालेल्या पोवाडा गायन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.

Advertisements

त्यांनी आज पर्यंत १२५ पेक्षा जास्त विविध ठिकाणी पोवाड्याचे गायन केले आहे.दरवर्षी शिवप्रताप दिन व शिवजयंतीला किल्ले प्रतापगड येथे पोवाडा गायन करतात. त्यांचे अनेक विद्यार्थी ही शाहीर झाले आहेत. शाहीर यादव यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांचे आ. मकरंद पाटील, सभापती सौ.संगीता चव्हाण, उपसभापती भैय्यासाहेब डोंगरे, जि.प.सदस्या सौ.शारदाकाकी ननावरे, पं.स.सदस्य दीपक ननावरे, जि.प. माजी अध्यक्षा सौ.अरुणादेवी पिसाळ, कृषिभूषण शशिकांत दादा पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, उपसभापती मदन भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, विस्ताराधिकारी मेमाने, वाळेकर, केंद्रप्रमुख राजेंद्र गायकवाड, विठ्ठल माने तसेच त्यांचे शिक्षक वर्गातून अभिनंदन होत आहे. ग्रामस्थ दरेवाडी नागेवाडी यांनीही शाहिरांचे अभिनंदन केले.

Related Stories

मराठी उद्योजक आनंद देशपांडे यांचा ‘फोर्ब्स’कडून सन्मान

Abhijeet Shinde

साताऱयातील 20 हॉस्पिटलला फायर ऑडिटच्या नोटिसा

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकास सात वर्षाची शिक्षा

Amit Kulkarni

दोन दिवस पाणीपुरवठा खंडित

Patil_p

यशवंतराव चव्हाण यांच्या कोल्हापुरातील पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण

Abhijeet Shinde

ड्रग्ज प्रकरण : नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने पाठवले समन्स

Rohan_P
error: Content is protected !!