तरुण भारत

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पलटी, चालक जखमी

गोकुळ शिरगाव/वार्ताहर

राष्ट्रीय महामार्गावरून बेंगलोरहुन पुण्याकडे जात असलेल्या ट्रकचा (MH-09-EM-8045) उजव्या बाजूचा टायर फुटल्याने महामार्गावर असणाऱ्या दुभाजकाला धडकून ट्रक दुभाजकामध्ये जागीच पलटी झाला. यात ट्रक चालक जखमी झाला. मुजुमिल हवालदार (रा.चिकोडी) असे या जखमी ट्रक चालकाचे नाव आहे.

या अपघातामध्ये ट्रकमधील सिमेंट पोती महामार्गावर पडल्याने महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. हा अपघात कणेरीवाडी फाट्याजवळ महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोर आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास झाला. घटनास्थळी महामार्ग पोलिस आणि गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत काहीवेळात वाहतूक सुरू केली.

ट्रक चालक किरकोळ जखमी झाल्याने त्याने स्वतः परस्पर उपचार घेतले आणि सिमेंट पोती दुसऱ्या ट्रक मधून पाठविण्यात आली. याबाबत कोणीच पोलिस ठाण्यात आले नसल्याने या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दीपोत्सव

Abhijeet Shinde

‘स्वाभिमानीची’ १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबर रोजी

Abhijeet Shinde

कोल्हापुरात कोरोनाने वृद्धाचा मृत्यू, नवे रूग्ण 15, कोरोनामुक्त 5

Abhijeet Shinde

कोल्हापूर हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव पाठवा – आ. चंद्रकांत जाधव

Abhijeet Shinde

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे अशक्य : देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

गोकुळ, जिल्हा बँकेत तिसरा पर्याय..!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!