तरुण भारत

असे करावे लक्ष्मीचे आवाहन

आध्यात्मिक ज्ञानाद्वारे परमात्म्याच्या प्रार्थनेने प्रथम मनाची साफसफाई करून घ्यावी. बुद्धीची शुद्धता, दृष्टी, वृत्तीची पवित्रता करून घ्यावी. परमात्म्याच्या स्मरणाने काम-क्रोधादी विकारांचा नाश होऊन आरोग्य चांगले राहील. जीवनात तन-मन-धन आणि कर्म यांची पवित्रता सांभाळावी. त्यामुळे जीवनात सुंदरता प्राप्त होते. जो सुंदर कर्म करतो आहे अशा प्रकारच्या महान कृत्यामुळेच आपल्यामध्ये नवचेतना उत्पन्न होऊन एक प्रकारचा मनात आनंद उत्पन्न होतो. वास्तविक हेच दिवाळीचे लक्ष्य असते. दुसऱया प्रकारचा अत्यंत सूक्ष्म प्रयत्न करावा की, मनरूपी मंदिरात आत्मारूपी दिवा जगवावा. जो सदा जागती ज्योतिप्रमाणे परमात्म्याशी तेवत ठेवावा. अशा प्रकारे प्रत्येकाची आत्मारूपी ज्योती जर तेवत राहिली तर सर्वांची मिळून एक दीपमाळा तयार होईल आणि मग तिच्यामुळे श्रीलक्ष्मी या पृथ्वीवर प्रकट होईल.

तिसऱया प्रकारचा प्रयत्न म्हणजे, आपल्या जुन्या विकर्माचा बहीखाता (हिशोब) परमात्म्याच्या आठवणीने वा प्रार्थना करून नष्ट करावा. नित्यनेमाने चांगले-वाईट फायदा-नुकसान व कर्माच्या हिशेबाकरिता एक वही ठेवावी. चौथ्या प्रकारचा प्रयत्न म्हणजे दुसऱयाला ज्ञानाचा प्रकाश दान करावा. ज्यामुळे संसारभर ज्ञानाचा प्रकाश पडेल आणि त्यामुळे प्रत्येकाचे जीवन आनंदी सुखमय बनेल.

Advertisements

पाचव्या प्रकारचा प्रयत्न म्हणजे मनातल्या मनात परमात्म्याचे चिंतन न चुकता मंत्ररूपाने चालू ठेवावे. जसे खाता-पिता, चालता-फिरता, ऐकता-बोलता, कर्म करताना न चुकता सतत जागती ज्योतिप्रमाणे चालू ठेवावे.

अशा या पाच प्रकारच्या प्रयत्नामुळे अवश्य या पृथ्वीवर श्रीलक्ष्मीचे आगमन होईल. आम्हाला खात्री आहे की सदा जागती ज्योति परमात्मा स्वतः अवतरित होऊन त्याकरिता प्रयत्न करीत आहे. कारण जवळच्या भविष्यात भारतात श्रीलक्ष्मी आणि श्रीनारायण यांच्या राज्याला प्रारंभ होणार आहे. त्या अगोदर फटाके व आतषबाजी चालतील. त्यानंतरच खऱया अर्थाने श्री लक्ष्मी व श्री नारायण यांचा राज्याभिषेक होईल. तेव्हाच खरी दिवाळी येईल. 

– ब्रह्मकुमार कृष्णा वेळीप, मोरपिर्ला

Related Stories

हल्ली आणि आमच्या वेळी

Patil_p

लस आणि लस

Patil_p

अथ श्रीरामकथा

Patil_p

रूग्णवाढ मंदावली,काळजी आवश्यकच

Patil_p

काय आले, काय गेले (2)

Omkar B

वृषभशाळेचें कपाट मुक्त

Patil_p
error: Content is protected !!