तरुण भारत

प्रलंबित विकासकामे दिवाळीनंतर पूर्ण करा

प्रतिनिधी / बेळगाव

शहरात विकासकामे राबविण्यासाठी पंधराव्या वित्त आयोग अनुदानांतर्गत निधी मंजूर झाला आहे. पण कामाच्या निविदा काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सदर विकासकामांच्या निविदा का काढण्यात आल्या नाहीत असा जाब मनपा प्रशासक जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी विचारला. तसेच एसएफसी अनुदानातील आणि शंभर कोटी अनुदानातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश मनपा अधिकाऱयांना बजावला.

Advertisements

विकासकामांचा आढावा प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी चौदाव्या वित्त आयोग अनुदानांतर्गत राबविण्यात आलेल्या पण प्रलंबित असलेल्या कामाची माहिती घेतली.  यंदा पंधरावा वित्त आयोग अनुदानामधून निधी मंजूर झाला आहे. तसेच कृती आराखडय़ाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.  पण सदर विकासकामांच्या निविदा मागविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे याबाबतचा जाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना विचारला. प्रशासकीय मंजुरी मिळाली असताना देखील निविदा मागविण्यास विलंब का? असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासकीय मंजुरी मिळाली की तातडीने निविदा काढून विकासकामे राबविण्यात यावीत, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली.

कामे पूर्ण करून बिले अदा करा

महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी मनपाच्यावतीने राबविण्यात येणाऱया कामांची माहिती दिली. 100 कोटी अनुदानांतर्गत राबविण्यात आलेल्या आणि राबविण्यात येणाऱया कामांची माहिती सादर केली. विकासकामे राबविण्याकरिता नगर विकास खात्याकडे अनुदानाची विचारणा केली असता, मंजूर झालेल्या निधीमधील विकासकामे अद्याप अर्धवट आहेत. निधीचा विनियोग केला जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निधीचा विनियोग का करीत नाही अशी विचारणा जिल्हाधिकाऱयांनी केली. तसेच सात कोटीची कामे शिल्लक असून येत्या आठवडय़ात शंभर कोटीतील कामे पूर्ण करून बिले अदा करा असा आदेश बजावला.

बैठकीला अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, नगर योजना अधिकारी बसवराज हिरेमठ, आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ, सामान्य प्रशासन उपायुक्त कंठी आदींसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

Omkar B

हलगा येथे गवतगंजीला शॉर्टसर्किटमुळे आग

Amit Kulkarni

जांबेटी येथे छायाचित्रकारांची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

शेतकऱयांनी घेतली प्रादेशिक आयुक्तांची भेट

Amit Kulkarni

म.ए.समितीच्या कोविड सेंटरला मदतीचा हात

Amit Kulkarni

सार्वजनिक स्थळी धूम्रपान करणाऱयांवर कारवाईची सूचना

Patil_p
error: Content is protected !!