तरुण भारत

आशियाई महामार्गावर उंब्रज येथे भीषण अपघात, ५ ठार

प्रतिनिधी / उंब्रज

आशियाई महामार्गावर उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या पुलालवरुन मिनीबस सुमारे ५० फुट खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिनीबस वाशीवरुन गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष एक महिला व तीन वर्षाचा मुलगा असे पाचजण ठार झाले आहेत.

उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे ५० फुट खाली कोसळली. यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा. अपघात पोलीस आणि स्थानिक नागरिकांना कळाला त्यानंतर नागरिक पोलिसांनी येथे धाव घेवून मदत कार्य सुरू केले आहे.

Advertisements

Related Stories

आता आले चक्क साडी नेसण्याचे ही कोर्स

Patil_p

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा उडणार ‘धुरळा’

Patil_p

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यात पहिल्या दिवशी एकच अर्ज

datta jadhav

जिल्हय़ात सात महिन्यात चिकुनगुनिया-डेंग्यूचे 124 रुग्ण

Patil_p

गणेश विसर्जन तळ्याच्या क्रेन आणि कागद टाकण्याची मागवली निविदा

Patil_p

बनावट नोटा बनवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!