तरुण भारत

सातारा : शिष्यवृत्ती परिक्षेत अंजली यादव राज्य गुणवत्ता यादीत 12 वी

औंध / वार्ताहर

 पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत औंध शिक्षण मंडळाच्या  श्री.श्री.विद्यालयातील अंजली मारुती यादव (आठवी) हिने राज्य गुणवत्ता यादीत 12 वा क्रमांक पटकावला आहे. 

नुकत्याच जाहीर झालेल्या  गुणवत्ता यादीत श्री. श्री. विद्यालयातील आठवीतील चार विद्यार्थींनींनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. यामध्येअंजली मारुती यादव हिने राज्य गुणवत्ता यादीत बारावे तर जिल्हा यादीत चौथे स्थान पटकावले. दिव्या संतोष जाधव (आठवी) जिल्हा गुणवत्ता यादीत  15 वी. वैष्णवी जितेंद्र पिसाळ (आठवी) जिल्हा गुणवत्ता यादी 130 वी. सानिया सुभाष राऊत (आठवी) जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 208 वा क्रमांक मिळवला आहे.  इयता पाचवी मध्ये आर्या  रविकिरण जाधव हिने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 197वा क्रमांक पटकाविला आहे

यशस्वी विद्यार्थ्यांचे  औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री ना.अजित पवार चेअरमन श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी,  विश्वस्त शंकरराव खैरमोडे, हणमंतराव शिंदे,  आब्बास आत्तार, राजेंद्र माने, प्रशांत खैरमोडे, सचिव प्रदीप कणसे,, सहसचिव प्रा.संजय निकम, प्राचार्य एस.बी. घाडगे, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचारी सभासद,ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक,मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

सातारा : मुक्तीचा आकडा झपाट्याने वाढतोय, हजारो बेड रिक्त तर काही सेंटरही रुग्णमुक्त

triratna

युवा कराडकर ग्रुप पत्रकार गुरव कुटुंबाच्या मदतीला धावला

Shankar_P

सातारा जिल्ह्यात 186 नागरिकांना दिला डिस्चार्ज, 617 नमुने पाठविले तपासणीला

triratna

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा बफरझोन रद्द करा, कांदाटी खोऱ्याची मागणी

triratna

साताऱ्यात पोलीस स्थापना दिना निमित्त कोविड जनजागृती कार्यक्रम

triratna

नाभिक कारागीर झाले कोरोना योध्दे

Patil_p
error: Content is protected !!