तरुण भारत

गतवषीच्या तुलनेत यंदा दिवाळीसाठी धावताहेत कमी बसेस

गतवषी 67 तर यंदा 51 जादा बसेस धावताहेत

बेळगाव / प्रतिनिधी

Advertisements

कोरोना काळात परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून सणासुदीच्या दिवसातील महसूलावर पाणी फिरले आहे. दरवषी परिवहनला गणेश चतुर्थी, दसरा व दिपाळीनिमित्त जादा बसची व्यवस्था येते. मात्र गणेश चतुर्थी व दसऱयाचा सीझन वाया गेला आहे. गतवषी दिवाळीच्या कालावधीत बसस्थानकातून 67 जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र यंदा केवळ 51 जादा बसेस धावत असल्याची माहिती परिवहनने दिली आहे.

दिवाळीसाठी बेळगाव बसस्थानकातून मुंबई, पुणे, बेंगळूर, मंगळूर आदी शहरांकडे जादा बसेस धावत आहेत. गुरूवारी बसस्थानकातून सुटलेल्या या बसेस शनिवारी सकाळी बेळगाव बसस्थानकात दाखल होणार आहेत. गतवषी दिवाळी काळात 67 बस धावल्या होत्या यामधून परिवहनला 54 लाखांचा महसूल मिळाला होता. मात्र यंदा 51 बस धावत आहेत. त्यामुळे महसूलात मोठी घट होणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे बरेचसे प्रवासी स्वतःच्या वाहनांचा वापर प्रवासासाठी करत असल्याने बसमध्ये प्रवाशांची संख्या कमी असलेली पहायला मिळत आहे. गतवषी दिवाळी कलावधीत 67 जादा बस धावत होत्या. त्या तुलनेत यंदा केवळ 51 जादा बसेस धावत आहेत. दिवाळीसाठी गावी परतणाऱया प्रवाशांची अधिक असते. त्याबरोबर बाहेर फिरणाऱयांची संख्या देखील अधिक असते. यादृष्टीने परिवहन या काळाकरिता विशेष बससेवा पुरविते. त्यामुळे या जादा बसमधून चांगला महसूल मिळत असतो. मात्र यंदा कोरोनामुळे सणासुदीत मिळणार परिवहनचा महसूलावर पाणी फिरले आहे. आधीच कोरोनामुळे परिवहनला 110 कोटीचा फटका बसला आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Stories

कर्नाटक: १४ दिवसांऐवजी ७ दिवसांसाठी होम क्वारंटाईन; नियमात बदल

Abhijeet Shinde

कर्नाटक: रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांच्या आहारात केले बदल

Abhijeet Shinde

तब्बल 13 लाखाचा दारूसाठा जप्त

Amit Kulkarni

दक्षिणमुखी मारुतीचीत रुईच्या पानांची पूजा

Patil_p

अंगडी महाविद्यालयात क्रिएटिव्ह क्लबचे उद्घाटन

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार?

Patil_p
error: Content is protected !!