काँग्रेससंबंधी मोहभंग : छोटय़ा पक्षांशी तडजोड
वृत्तसंस्था/ लखनौ
आगामी विधानसभा निवडणुकीत छोटय़ा पक्षांशी तडजोड करणार असलो तरीही मोठय़ा पक्षांशी कुठल्याही प्रकारची आघाडी करणार नसल्याची भूमिका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी मांडली आहे. यादरम्यान त्यांनी शिवपाल यादव यांचा पक्ष समाजवादी पक्षात विलीन होण्याच्या चर्चेवरही मत व्यक्त केले आहे.
राज्यात सरकार स्थापन केल्यावर प्रगतिशील समाजवादी पक्षाच्या नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद देऊ. शिवपाल यादव यांच्या पीएसपीसोबत जागांसंबंधी तडजोड करण्यात येणार आहे. जसवंतनगर हा शिवपाल यांचा मतदारसंघ असून समाजवादी पक्ष तेथे उमेदवार उभा करणार नसल्याचे अखिलेश म्हणाले.
पोटनिवडणूक जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक लढत असल्यास कोण जिंकणार? भाजप नव्हे त्यांच्या सरकारचे सर्व अधिकारी निवडणूक लढवत होते. बिहारमध्ये महाआघाडीला जनतेने समर्थन दिले, परंतु भाजपने तेथे लोकांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.