तरुण भारत

शेअर बाजारात ‘मुहूर्ता’वर दिवाळी

बीएसई निर्देशांकात 195 तर निफ्टीत 60 अंकांनी वधार

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

दिवाळीच्या ‘मुहूर्त’ टेडिंगच्या निमित्ताने शनिवारी शेअर बाजारात दिवाळीची धामधूम दिसून आली. सुरुवातीला सेन्सेक्समध्ये 336.14 अंकांची वाढ नोंद झाल्याने बीएसई निर्देशांक 43,779.14 या सर्वोच्च पातळीवर खुला झाला. तसेच निफ्टी निर्देशांकही प्रारंभी 102.10 अंकांनी वधारल्यामुळे 12,822.05 या सर्वोच्च पातळीवर खुला झाला होता. मात्र, बंद होताना बीएसई निर्देशांक 43,637.98 वर बंद झाल्याने 194.98 अंकांची वाढ नोंदली गेली. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांक 60.30 अंकांच्या वाढीसह 12,780.25 च्या पातळीवर बंद झाला.

दिवाळी-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘मुहूर्ता’वर सायंकाळी 6 ते 7 या एका तासासाठी शेअर बाजार सुरू ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार शनिवारी बीएसई निर्देशांक 0.45 टक्क्यांनी वधारला. एनएसईचा निफ्टी निर्देशांकही 60.30 अंकांनी म्हणजेच 0.47 टक्क्मयांनी वाढत आतापर्यंतच्या 12,780.25 या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. निफ्टीने या सत्रादरम्यान 12,828.70 या विक्रमी पातळीला गवसणी घातली होती.

मुंबई शेअर बाजारातील भारती एअरटेल, टाटा स्टील, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि ओएनजीसी या कंपन्यांचा फायदा 1.17 टक्क्मयांनी वाढला. तर, पॉवरग्रीड, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्स यांचे समभाग 0.32 टक्क्मयांपर्यंत खाली आले.

Related Stories

कोरोना काळात शरिरसंपदेचे महत्व अधोरेखित : चंद्रकांत पाटील

Rohan_P

स्मार्टफोन शिपमेंट 16 कोटींपेक्षा कमीच राहणार?

Amit Kulkarni

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे बाजारातील तेजीत घसरण

tarunbharat

निवडणुकीसाठी जातीचे राजकारण करणे वाइट : राज ठाकरे

Rohan_P

‘बाप’ काढल्याच्या वादग्रस्त ट्विटनंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडून त्या शिवसैनिकाची हकालपट्टी

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 32,634 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!