तरुण भारत

मुख्यमंत्री येडियुरप्पा पुढील आठवड्यात दिल्ली दौर्‍यावर

बेंगळूर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुढील आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्षाच्या अन्य केंद्रीय नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा करण्यासाठी दिल्ली दौर्‍यावर जाण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये सरकार स्थापनेवर लक्ष केंद्रित असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते व्यस्त आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तारखेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मुख्यमंत्री मुख्य नेतृत्त्वाकडून भेटीची वाट पहात आहेत. ते इच्छुकांची यादी घेऊन पक्षाच्या नेत्यांकडून त्याला मंजुरी मिळाल्यांनतर विस्तार होईल. मुख्यमंत्र्यांसह ३४ कॅबिनेटची मंजूर आहे. सध्या सात मंत्री पदे रिक्त आहेत.

भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना एमएलसी एम. टी. बी. नागराज, एच.विश्वनाथ आणि आर. शंकर यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे लागेल. त्यांनी पक्षाला राज्यात सरकार स्थापनेत मदत केली होती. तसेच आरआर नगर पोट निवडणुकीत विजयी झालेले मुनिरत्न हे देखील बंडखोरी गटात सहभागी होते.

दरम्यान, केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निधी म्हणून राज्याला ५७७.७४ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केल्यानंतर, येडियुरप्पा यांनी सरकार पूर पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी केंद्राकडून अतिरिक्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. राज्यात यावर्षी पूर परिस्थिती गंभीर होती, विशेषतः उत्तर कर्नाटकातील विविध भागात मोठी हानी झाली आहेर. दरम्यान ३५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Advertisements

Related Stories

विकेंड कर्फ्यूवेळी विनाकारण फिरणाऱयांची वाहने जप्त करा

Amit Kulkarni

काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत : शिवकुमार

Abhijeet Shinde

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांची कोरोना,पूर आणि मदत कार्याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा

Abhijeet Shinde

कर्नाटकात ‘या’ ठिकाणी भारत बायोटेकच्या लसीचे उत्पादन होणार

Abhijeet Shinde

शासकीय विभाग ५० टक्के क्षमतेने कार्यरत राहतील

Abhijeet Shinde

नववी ऑक्सिजन एक्स्प्रेस बेंगळुरात दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!