तरुण भारत

कोल्हापूर : मुलीच्या वर्षश्राध्दाला वड वृक्षांच्या रोपांचे वाटप करून दिला आठवणीला उजाळा

राजनंदिनी यादव हिचा अपघातात झाला होता मृत्यू

मिणचे खुर्द /वार्ताहर 

म्हसवे (ता. भुदरगड) येथील अजित यादव व कुटुंबीयांनी मुलगी ‘राजनंदिनी’ च्या वर्षश्राध्दाला वड वृक्षांच्या रोपांचे वाटप करून मुलगीच्या आठवणीला उजाळा दिला.

मुलीच्या पहिल्या वर्षश्राध्दास वडाच्या रोपट्याची अनोखी भेट देऊन मुलीच्या दुःखावर फुकर घातली. कोरोना महामारीत रुग्णांना सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता भासत होती. याच कारणातून ऑक्सिजन देणारे वडाच्या वृक्षांची सर्वत्र लागवड करणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल व पर्यावरणाचे रक्षण यासाठी झाडांचे वृक्षारोपन होणे गरजेचे आहे या जाणिवेतून अजित व अनुजा यादव यांनी वडाच्या रोपांचे वाटप केले.

‘राजनंदिनी’ हिचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होतेय. गतवर्षी दीपावली दरम्यान ‘राजनंदिनी’ कायमची सोडून गेली. रोपाच्या रुपाने आपल्या लाडक्या मुलीची स्मृती चिरंतन स्मरणात राहावी यासाठी रोपांचे वृक्षारोपण व्हावे या उदात्त हेतूने उपक्रम राबवला. वडाची रोपे जगविणाऱ्यांचा पुढच्या दीपावलीत आहेर करण्यात येणार आहे. यादव कुटुंबियांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Related Stories

ओमिक्रोनची कोल्हापुरात एंट्री, शहरात खळबळ

Sumit Tambekar

वारणा उजवा कालव्याच्या बाजूच्या ७५० वृक्षाची विनापरवाना कत्तल,मुरूमही चोरीला

Abhijeet Shinde

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ठरणार खंडपीठ कृती समिती आंदोलनाची दिशा

Abhijeet Shinde

बंदला आजर्‍यात प्रतिसाद 

Abhijeet Shinde

एक महिन्यात कोल्हापूरमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट

Abhijeet Shinde

वाळूची चोरटी वाहतूक करणारे १४ ट्रक जप्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!