तरुण भारत

बिहारमध्ये आहे एक ‘असा’ही आमदार!

चौथ्यांदा आमदार तरीही करतात शेती; राहण्यासाठी नाही पक्के घर 

ऑनलाईन टीम / पाटणा : 

Advertisements

बिहारमध्ये एक असा आमदार आहे, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. बिहार निवडणुकीत चौथ्यांदा निवडून आलेले महबूब आलम व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांच्याकडे राहण्यासाठी आजही पक्के घर नाही. 

44 वर्षीय आलम हे स्वतः शेती करतात, चालत फिरतात. त्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे. बिहारच्या कटीहार जिल्ह्यातील बलरामपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सीपीआय एमएलकडून निवडणूक लढताना आलम यांनी व्हीआयपीचे उमेदवार वीरेंद्र कुमार ओझा यांचा 53 हजार 597 मतांनी पराभव केला. 

सन 2015 मध्ये जेव्हा जदयू-राजद आणि काँग्रेस एकत्र लढले होते. तेव्हाही सीपीआय एमलकडून आलम निवडून आले होते. तेव्हा त्यांनी भाजप उमेदवार बरुनकुमार झा यांचा 20,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. 

2016 मध्ये आलम यांच्यावर एका बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला थप्पड मारल्याचा आरोप होता. आलम यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा आरोप सिद्ध झाला होता.

Related Stories

सुवेंदू अधिकारींसह भावाविरोधात तक्रार

Patil_p

टोलनाक्यांवर नववर्षात प्री-पेड कार्ड सुविधा

Patil_p

पदवी अंतिम वर्ष-सेमिस्टर वगळता इतर विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण

Patil_p

उत्तराखंडात 448 नवे कोरोना रुग्ण; 13 मृत्यू

Rohan_P

लसीकरणात भारत तिसऱया क्रमांकावर

Patil_p

राज्यात दिवसभरात 464 रुग्ण संसर्गमुक्त

Patil_p
error: Content is protected !!