तरुण भारत

देशात 30,548 नवे कोरोना रुग्ण, 435 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 30 हजार 548 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 435 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 88 लाख 45 हजार 127 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 30 हजार 070 एवढी आहे.

Advertisements

रविवारी दिवसभरात 43,851 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 65 हजार 478 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 82 लाख 49 हजार 579 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 12 कोटी 56 लाख 98 हजार 525 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 8 लाख 61 हजार 706 कोरोना चाचण्या रविवारी (दि.15) करण्यात आल्या.

Related Stories

चार दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये कंठस्नान

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 25,367 वर

Rohan_P

दिल्लीत सध्या लॉकडाऊनची गरज नाही; पण… : सत्येंद्र जैन

Rohan_P

एच-1बी व्हिसावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात दिलासा

Patil_p

JEE, NEET परीक्षा वेळेतच होणार : सुप्रीम कोर्ट

datta jadhav

अमेरिकेत ‘नमस्ते भारत’

Amit Kulkarni
error: Content is protected !!