तरुण भारत

आजपासून सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडीला सुरुवात

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्णय

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून केवळ कोरोना रुग्णांसाठीच वॉर्ड उपलब्ध करण्यात आले होते. इतर कोणत्याही आजाराचे वॉर्ड बंद करण्यात आले होते. ओपीडीदेखील बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सोमवार दि. 16 पासून ओपीडी (बाहय़ रुग्ण विभाग) सुरू करण्याचा निर्णय सिव्हिल प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गरीबांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच डॉक्टरांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. ओपीडी सुरू करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेने तसेच विविध संघटनांनी अनेकवेळा केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता जिल्हाधिकाऱयांनी ओपीडी सुरू करण्याचा आदेश दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

ओपीडी बंद असल्यामुळे रुग्णांना खासगी हॉस्पिटलकडे धाव घ्यावी लागत होती. मारहाणीच्या घटना तसेच सर्पदंश आणि विषप्राशन झालेल्या रुग्णांनाही खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. त्यामुळे जनतेला मोठा त्रास होत होता. आर्थिक फटकादेखील बसत होता. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाकाळात उपचार करण्यास कोणीच तयार नव्हते. त्यामुळे अनेकांना प्राणही गमवावा लागला. महत्त्वाचे म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागातदेखील दाखल करण्यास घेण्यास विरोध करण्यात येत होता.

ग्रामीण भागातून आलेल्या अनेक महिलांना रात्रभर हॉस्पिटलच्या कठडय़ावर बसून रहावे लागत होते. अशा गंभीर घटना घडत होत्या. याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आता ओपीडी सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही विभागही सुरू करण्यात येणार असल्याचे बिम्सच्या संचालकांनी सांगितले आहे. ओपीडी सुरू झाल्यामुळे आता ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे.

Related Stories

उचगाव येथील ऊंच रस्ते शेतकऱयांच्या मुळावर

Amit Kulkarni

रामनगर-खानापूर रस्त्याचा वनवास संपणार कधी

Patil_p

दिवाळीच्या खरेदीतच जनावरांचा ठिय्या

Amit Kulkarni

रथोत्सवावेळी फटाक्यांमुळे रामदुर्ग येथे रथाला आग

Amit Kulkarni

दीडशे-दोनशे रुपयांसाठी हजाराचा खर्च!

Amit Kulkarni

संभाजी गल्लीतील व्हॉल्वमधून हजारो लिटर पाणी वाया

Amit Kulkarni
error: Content is protected !!