तरुण भारत

ट्रम्प, मेलानिया, बायडेन, कमला हॅरिस यांच्याकडून दिवाळी सणाच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रथम महिला मेलानिया यांनी भारतीय समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनीही भारतीयांना प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Advertisements

प्रथम महिला आणि मी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रकाशाच्या या सणात तुम्ही मित्र, शेजारी आणि आप्तांसोबत रहावे आणि असत्यावर सत्याच्या विजयाच्या स्वरुपात हा सण साजरा करावा. अंधकारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञानाचा विजय व्हावा, प्रत्येक घरात दिप प्रज्ज्वलित केले जातील. हा सण आशा आणि समर्पणाचा पारंपरिक संदेश देतो असे ट्रम्प यांनी नमूद केले आहे.

अमेरिका श्रद्धेवर विश्वास ठेवणारा देश आहे. माझ्या प्रशासनाने नागरिकांचे घटनात्मक अधिकार आणि त्यांच्या श्रद्धंचे रक्षण केल्याने गर्व वाटतो. जगात जेथे कुठे दिवाळी साजरी केली जात आहे, त्या सर्व लोकांसाठी या उत्सवाच्या शुभेच्छा देतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

बायडेन यांचा संदेश

लाखो हिंदू, जैन, शीख आणि बौद्धधर्मीयांना प्रकाशपर्वाच्या शुभेच्छा. आगामी वर्ष तुमच्या अपेक्षा, आनंद आणि समृद्धीत भर करणार असल्याची आशा करतो असे बायडेन यांनी म्हटले आहे.

हॅरिस यांच्याकडून शुभेच्छा

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा महिला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळविणाऱया भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील प्रत्येक हिस्स्यात सुरक्षित आणि आनंदाने दिवाळी साजरा करत असल्याची आशा असल्याचे हॅरिस यांनी नमूद केले आहे.

Related Stories

ज्यूंच्या धार्मिक स्थळावर अमेरिकेत हल्ला

Patil_p

दहशतवादी म्होरके पाकिस्तानी नागरिक

Patil_p

काही हिंदू-शीख सुरक्षित स्थळी

Patil_p

‘युएन’मध्ये पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Amit Kulkarni

प्रथम डेंग्यु-हिवताप नंतर कोरोना.. कोब्रादंश.. तरीही सुखरुप

Omkar B

पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!