तरुण भारत

मुंबई सिटी एफसी खेळाडूंकडून बालदिन साजरा

वृत्तसंस्था/ मुंबई

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया मुंबई सिटी एफसी संघाच्या फुटबॉलपटूंनी शनिवारी येथे बालदिन साजरा करताना खास ऑलिंपिक भारत ऍथलीट्सशी संपर्क साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Advertisements

मुंबई सिटी एफसी संघातील फुटबॉलपटूंनी शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन  एका वेगळय़ा ढंगात साजरा करण्याचे ठरविले होते. या कार्यक्रमामध्ये मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंना ऑलिंपिक खास ऍथलीट्सशी संपर्क साधून त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. भारताचा आंतरराष्ट्रीय आणि अनुभवी फुटबॉलपटू मंदार राव देसाई, मुंबई सिटी संघाचे प्रमुख प्रशिक्षक सर्जीओ लोबेरा तसेच मॅन्युअल सायबेरा यांच्याशी संपर्क साधला गेला. 2020-21 इंडियन सुपर लीग हंगामासाठी मुंबई सिटी एफसीच्या फुटबॉलपटूंनी खास ऍथलीट्सशी संवाद साधताना विविध विषयावर चर्चा केली. या कार्यक्रमामध्ये भारताच्या खास ऑलिंपिक फुटबॉलपटूंच्या शैलीचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात मुंबई सिटी एफसी संघाचा सलामीचा सामना 21 नोव्हेंबरला नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी संघाबरोबर गोव्यात होणार आहे.

Related Stories

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे यंदा प्रथमच‘व्हर्च्युअल’ वितरण

Patil_p

इमा रॅडूकनूची सराव स्पर्धेतून माघार

Patil_p

भारत-द आफ्रिका महिला क्रिकेट मालिका बेंगळूरला आयोजन

Patil_p

आयव्हरी कोस्टच्या माजी फुटबॉलपटूचे निधन

Patil_p

हजारो मुलांना क्रिकेटचे ऑनलाईन प्रशिक्षण

Patil_p

टी. नटराजनची तामिळनाडू संघातून मुक्तता

Amit Kulkarni
error: Content is protected !!