तरुण भारत

अभिनेत्री वैदेही परशुरामी ठरली युवा तेजस्वी चेहरा

 तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, गेली तीन वर्षे झी युवा सन्मान हा सोहळा झी युवा वाहिनीवर आयोजित करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱया युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. काही विशेष पुरस्कार या सोहळय़ात प्रदान करण्यात येतात. यंदाही हा सोहळा मोठय़ा दिमाखात पार पडला.

या पुरस्कार सोहळय़ात, मराठी सिनेसफष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी हिला युवा तेजस्वी चेहरा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी. तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे. अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियाच्या विश्वातसुद्धा तिने निराळी प्रसिद्धी मिळवली आहे.

Advertisements

प्रत्येक आव्हानात्मक भूमिका वैदेहीने मोठय़ा पडद्यावर अगदी सहज सोप्या पद्धतीने साकारली मग ती एफयूमधील बिनधास्त रेवती असो किंवा डॉक्टर काशिनाथ घाणेकर मधली अल्लड कांचन, वजीर मधली समंजस नीना किंवा थेट सिम्बा या हिंदी चित्रपटातील तिने साकारलेली आकृतीची भूमिका असो. मराठी सोबतच हिंदी चित्रपटात आपल्या यशस्वी वाटचालीला सुरुवात करणाऱया या लोकप्रिय अभिनेत्रीला शुभेच्छा आणि तिच्या कारकिर्दीला प्रोत्साहन देत वैदेहीचा सन्मान झी युवा सन्मान सोहळय़ात करण्यात आला.

या पुरस्काराच्या बरोबरीने, इतरही अनेक पुरस्कारही देण्यात आले. सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील पुरस्कार सुद्धा या सोहळय़ात प्रदान करण्यात आले आहेत

Related Stories

20 वर्षांनी तेलगू चित्रपटात काम करणार शिल्पा शेट्टी

Patil_p

नक्सल वेबसिरीजमध्ये राजीव खंडेलवाल प्रमुख भूमिकेत

Patil_p

नयनतारा लवकरच होणार विवाहबद्ध

Patil_p

अक्षय महादेवाच्या अवतारात

Patil_p

‘बिंडा’चे पोस्टर प्रकाशित

prashant_c

‘येऊ कशी तशी मी नांदायला’चा ऍक्शनपॅक्ड आठवडा

Patil_p
error: Content is protected !!