तरुण भारत

स्टार प्रवाहवर विनोदाची आतषबाजी

दिवाळीच्या शुभमुहुर्तावर म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर कॉमेडी बिमेडी हा नवा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळीला विनोदाची खमंग मेजवानी प्रेक्षकांना मिळाली. आशिष पवार, दिगंबर नाईक, अतुल तोडणकर, मंगेश देसाई, किशोरी अंबिये, आरती सोळंकी, संतोष पवार, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, परी तेलंग, प्राजक्ता हनमघर, शेखर फडके, बालाजी सुळ, देवयानी मोरे, शर्वरी लहादे आणि पूर्णिमा अहिरे हे 16 विनोदवीर आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 या कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी निर्मिती सावंत, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, सुप्रिया पाठारे, विकास समुद्रे, विजय पटवर्धन, अतुल आणि सोनिया परचुरे हे खास पाहुणे होते. तर पहिल्या भागाचे सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे आणि कविता लाड- मेढेकर यांनी केले. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. कॉमेडी बिमेडी कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा वेचण्याचा प्रयत्न असेल. या कार्यक्रमाचं वैशिष्टय़ म्हणजे इथे कोणत्याही स्वरुपाची स्पर्धा नसेल त्यामुळे शोमध्ये परीक्षण नाही आणि परीक्षण नसल्यामुळे इथे परीक्षकही नाहीत. विनोदवीरांच्या जोडय़ा धमाल विनोदी स्कीटचं सादरीकरण करतील. त्यामुळे 1 तास प्रेक्षकांचं फक्त आणि फक्त मनोरंजन होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सूत्रसंचालकही नसेल. त्यामुळे विनोदवीरच थेट प्रेक्षकांशी संवाद साधतील. हा नवा कार्यक्रम कॉमेडी बिमेडी 15 नोव्हेंबरपासून रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर सुरु झाला आहे.

Related Stories

संजय दत्तने केली कर्करोगावर मात !

pradnya p

करण जोहरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र; बॉलीवूडबाबत म्हणाला…

pradnya p

दीपिकाने दिली ड्रग्ज चॅटची कबुली; सारा, श्रद्धाची चौकशी सुरु

pradnya p

या आठवडय़ात

Patil_p

रीयाच्या अडचणी वाढल्या; आता 20 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

pradnya p

गुन्हेगाराशी दोन हात करणारा किंग्ज मॅन

Patil_p
error: Content is protected !!