तरुण भारत

आई माझी काळुबाई मालिकेचे पन्नास भाग पूर्ण

दिवाळीला सर्वत्र सुरुवात झाली आहे. अंधारावर मात करून सगळीकडे दिव्यांची रोशणाई पसरू लागलीये. याच दरम्यान सोनी मराठीवरील आई माझी काळुबाई मालिकेचा 50 वा भाग प्रदर्शित झाला.

या निमित्तानी सेटवर श्रीसत्यनारायणाची पूजा आणि देवी काळुबाईची पूजा केली होती. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी या पूजेमध्ये भक्तिभावाने सहभाग घेतला. मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. आत्तापर्यंत आलेल्या सर्व संकटांवर मात करून आई माझी काळुबाई या मालिकेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. या पूजेदरम्यान सेटवर अतिशय मंगलमय आणि उत्साहाचं वातावरण होतं. सर्व टीमनी या पूजेचा आनंद घेतला आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन मालिकेच्या चित्रीकरणाला नव्या जोमाने सुरुवात केली. शरद पोंक्षे, अलका कुबल- आठल्ये, विवेक सांगळे, वीणा जगताप, संग्राम साळवी, प्रसन्न केतकर अशी सर्व कलाकार मंडळी या पूजेसाठी आवर्जून उपस्थित होती. वीणा जगताप साकारत असलेल्या आर्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. मालिका आता अत्यंत रंजक वळणावर आली असून आर्याच्या आयुष्यात पुढे काय घडतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे. ही मालिका संध्याकाळी 7 वाजता सोनी मराठीवर प्रसारित होते.

Advertisements

Related Stories

…म्हणून दीपिकाने दिला नकार

tarunbharat

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीविरोधात गुन्हा दाखल

Rohan_P

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर झळकणार वेल डन बेबी

Patil_p

ड्रग्ज कनेक्शन : चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला NCB ची अटक

Rohan_P

सायनावरील बायोपिक 26 मार्चला झळकणार

Patil_p

उर्वशी रौतेला परतली सेटवर

Patil_p
error: Content is protected !!