तरुण भारत

आटपाडी तालुक्यात विजेचा धक्का लागून शिक्षकाचा मृत्यू

आटपाडी / प्रतिनिधी

शेतातील पिकांना पाणी पाजण्यासाठी विहीरीवरील मोटर चालु करण्यासाठी गेल्यानंतर वीजेचा तीव्र धक्का लागुन जांभुळणी येथील विष्णु विलास गावडे (४४) या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बेरगळवाडी-धडसवस्ती येथे घडली.

मयत विष्णु गावडे हे घरनिकी येथील न्यु हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणुन कार्यरत होते. जांभुळणी-गावडेवस्ती हे त्यांचे गाव असुन ते धडसवस्ती येथील शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोटर सुरू करण्यासाठी गेले. विद्युत पेटीलगतच त्यांना विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युचे वृत्त समजताच गावडे कुटुंबियांसह जांभुळणी गावावर शोककळा पसरली. पै. रावसाहेब गावडे यांचे ते बंधु होते. जांभुळणीच्या पोलीस पाटील अनिता पाटील यांनी याबाबतची माहिती पोलीसात दिली. तपास पोलीस नाईक संकपाळ करीत आहेत.

Advertisements

Related Stories

सांगली : सुळकाई डोंगर परिसराची स्वच्छता मोहिम

Abhijeet Shinde

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Abhijeet Shinde

सांगलीत प्रजासत्ताक दिनी शुद्धपेयजलाचे उद्घाटन

Abhijeet Shinde

पाच खाजगी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

पुराणकथांनी पुरुषांना स्त्रियांवर अन्याय करायला शिकवले – डॉ.तारा भवाळकर

Abhijeet Shinde

‘तालुकास्तरावरील कृषी प्रदर्शने शेतकऱयांना वरदान ठरतील’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!