तरुण भारत

पलूस – कडेगावच्या “कुरुक्षेत्रात” एैन दिवाळीत “सन्नाटा”


वसगडे / वार्ताहर

पुणे पदविधर मतदार संघातुन भाजपकडुन संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहिर झालेनंतर महाआघाडी तुन राष्ट्रवादीने अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर केली. एैन रब्बी हंगामात पाच जिल्ह्यात राजकिय मशागतीना चांगलाच वेग आला अाहे. प्रमुख उमेदवार मतदारसंघांतील असताना पलूस- कडेगावच्या राजकिय “कुरुक्षेत्रात” सन्नाटा पसरला आहे. राष्ट्रवादीने लाड यांची उमेदवारी जाहिर केल्याने “पुराेगामीचा हा राजकिय ‘विळा’ भाजपच्या कमळाचा खुडा करणार का ? ‘विश्व’ विस्ताराची पाेटरी धरलेल्या काँग्रेसच्या फुटव्याला मतदारसंघांतच अटकावा करणार यांची चर्चा सध्या मतदारसंघांत रंगली आहे. या लढतीमुळे मतदारसंघांत उभी फुट पडणार असुन भविष्यातील मतधिक्य घटविणारी स्वबळाची झलक दिसत असल्याने राष्ट्रवादीचा हा टप्प्यातला ‘करेक्ट कार्यक्रम’ असल्याचे राजकिय गाेटातुन बाेलल जात आहे. त्यामुळे कार्यकर्ते सध्या द्विध्दा मनस्थितीत सापडले आहेत.

१९९५ साली अपक्ष आमदारचे सारथी पृथ्वीराज देशमुखांनी राज्यातील आखाडे जाणुन घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी जवळीकता निर्माण करीत केली . मात्र जिल्ह्यातील तिन मंत्र्याच्या अंडरस्टँडीगंच्या राजकारणाने त्यांचा दरवेळी राजकिय बळी दिला गेला.
विळा – कणीस चिन्ह घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्त्व केलेल्या स्व. जी.डी.लाड यांची प्रेरणा घेऊन चळवळीतुन राजकारणाला सुरवात केलेल्या अरुण लाड यांना पलूस तालुक्यातील खंडाेबाचीवाडी येथे घड्याळाची टिक टिक एैकवुन जिल्ह्यातील दाेन दिग्गज मंत्र्याना हुलकावणी देत माजी आ.पृथ्वीराज देशमुख यांनी ही फत्तेसिकस्त करीत लाडांचा राष्ट्रवादी प्रवेश घडवुन आणला. यामुळे मतदारसंघांचा बराेबर जिल्ह्याच्या राजकारणाचा नुर बदलला मात्र यामुळे पुराेगामी विचाराना जिल्हाभर तडे गेले. पुढिल काळात चळवळीचा केंद्रबिंदू कवठेएकंद पुरताच त्यामुळे पुराेगामीचा बहुतांश विराेध मावळला. २००२ साली गाव तिथे शाखा निघत राष्ट्रवादीचा विस्तार वाढत गेला यात दुष्काळी फाेरम चा सिंहाचा वाटा हाेता.

आता कम्युनिस्ट विचारांचे लाड, दुष्काळी फाेरमचा नेता म्हणुन उदयास आलेले देशमुख याच्यातच थेट लढत हाेत आहे. एकेकाळचे सच्चे मित्र आज पक्के विराेधक बनन्याच्या मार्गावर अाहेत. त्यामुळे साेचा न था एैसी ‘घडी’ भी आएगी म्हणण्याची वेळ आण्णा-बाबा सह कार्यकर्त्यावर आली आहे. राजकारणात कुणी कुणाचा शत्रु किंवा मित्र नसताे पण या लढतीमुळे गावागावातील कार्यकर्त्याच्या राजकिय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पदविधर निवडणुकींच्या माध्यमातुन पहिल्यांदा एकमेकांच्या विराेधात उभे राहिलेल्या लाड – देशमुखांमुळे बीस साल बाद या भिलवडी – वांगी च्या राजकारणाने यु टर्न घेतला आहे.

पलूस तालुक्यात ३५ वर्षानी उमेदवारी

राष्ट्रवादीचे लाेकाभिमुक काम तळागाळात पाेहचवीत दिग्गजांना हाेम ग्राऊंड वर आणण्यात लाड कुटुंबीय यशस्वी झाले. त्यामुळे ३५ वर्षानी पलूस तालुक्यात पक्षाची अधिकृत उमेदवारी देणेत आली. तसेच जिल्ह्यातील बीजेपीची परेड वाढविण्याकरिता देशमुखाचा महत्वाची भुमिका असल्याने ते ही उमेदवारीचे दावेदार ठरले. परंतु पलूस- कडेगाव मतदारसंघांतील लाड- देशमुख यांचे बहुतांश कार्यकर्ते एकच आहेत. राज्यातील असून नसलेली सत्तेची फळे चाखायला न मिळता वीस वर्षे लाड – देशमुखांची काँग्रेस विराेधी वोटबँक जशीच्या तशी राहिली हाेती. सांगली जिल्ह्यातील इतर मतदार संघात राष्ट्रवादीने विधानपरिषदेची ताकद देऊन राजकिय वजन वाढवले मात्र पलूस-कडेगावला ‘हात’ आकडता घेतला हाेता त्यामुळे अरुण लाड यांना गतवर्षी पुणे पदविधर मधुन बंडखाेरी करायला लागली हाेती.
देशमुखांनी २०१४ साली भाजपची उमेदवारी घेतली तरी सुध्दा आण्णा-बाबांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तद्नंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकींत दाेघांनी एकत्रित सत्ता राखत काँग्रेसला बाजुला ठेवले हाेते. मात्र समाेरा समाेरील लढतीमुळे मतदारसंघांची पक्षीय ‘फाळणी’ निश्चीत असल्याने काय भुमिका घ्यायची अशी पंचाईत सर्व सामान्य कार्यकर्त्यांची झाली आहे.

काेणता झेंडा घेऊ हाती ?

ऊस उत्पादकांना क्रांती कारखान्यांचा आधार मिळत असल्याने लाड कुटुंबाशी आणि महसुली, विकास कामासाठी देशमुखांशी संपर्क साधावाच लागताे त्यामुळे कार्यकर्ते आतापर्यंत दाेघांशी समान अंतरावर हाेते. आताची राजकीय परिस्थिती बदलुन आमने सामने लढत असल्याने आता कोणता झेंडा घेऊ हाती ? अशा संभ्रम अवस्थेत कार्यकर्ते आहेत. यामुळे पलूस-कडेगाव मधील अनेकांनी हाेम काँरटाइन हाेने पसंद केल्याचे दिसत आहे. घाटाखालील जनता ‘अब की बार’ पलूस तालुक्याचा आमदार करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसत असताना घाटावरची जनता ‘आम्ही कडेगावकर’ म्हणत दाेनाचे तीन आमदार करण्याच्या नादात आहेत. त्यामुळे लढत तुल्यबल हाेणार आहे.

Advertisements

Related Stories

तर बाळासाहेबांनी राऊतांच्या थोबाडीत …. – चंद्रकांत पाटील

Sumit Tambekar

मुख्यमंत्री ठाकरे उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार

Abhijeet Shinde

आर्यन खानला मोठा दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर

Abhijeet Shinde

कराडला 18 वर्षावरील 256 युवकांना लस

Patil_p

वाळव्यात तरुणावर खुनी हल्ला

Abhijeet Shinde

प्रदूषण करणार्‍या कारखान्यांवर फौजदारी करा

tarunbharat
error: Content is protected !!