तरुण भारत

जोकोव्हिच, मेदव्हेदेव यांचे शानदार विजय

वृत्तसंस्था/ /लंडन

येथे सुरू असलेल्या 2020 च्या टेनिस हंगामातील एटीपी टूरवरील पुरूषांच्या अंतिम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिच तसेच रशियाचा मेदव्हेदेव यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदविले. जोकोव्हिचने अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनला तर मेदव्हेदेवने जर्मनीच्या ऍलेक्सझांडर व्हेरेव्हचा पराभव केला.

या स्पर्धेत मानांकनात टॉप सिडिंग मिळविलेल्या सर्बियाच्या जोकोव्हिचने आतापर्यंत पाचवेळा अजिंक्यपद पटकाविले असून स्वीसच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी जोकोव्हिचला आणखी एकदा या स्पर्धेचे जेतेपद मिळविणे जरूरीचे आहे. सोमवारी झालेल्या या स्पर्धेतील सामन्यात जोकोव्हिचने अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. जोकोव्हिचचा पुढील सामना रशियाच्या मेदव्हेदेव बरोबर होणार आहे. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचने सलग पाच गेम्स जिंकले तर दुसऱया सेटमध्ये त्याने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. 2007 पासून या स्पर्धेत जोकोव्हिचने आतापर्यंत आपला सलामीचा सामना गमविलेला नाही. जोकोव्हिचने एकूण सहावेळा शुवार्त्झमनचा पराभव केला आहे. एटीपी टूरवरील ही अंतिम स्पर्धा सलग 12 वर्षे लंडनमध्ये खेळविली जात आहे पण पुढीलवर्षी सदर स्पर्धा इटलीतील टय़ुरिन येथे घेतली जाणार आहे.

या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हचा 6-3, 6-4 असा पराभव केला. 2018 साली व्हेरेव्हने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. यावेळी आता या स्पर्धेचे टोकियो गटामध्यें मेदव्हेदेव आणि जोकोव्हिच यांनी आपले सलामीचे सामने जिंकले आहेत. 2007 साली जोकोव्हिचने पहिल्यांदा या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविताना आपल्या गटातील सर्व म्हणजे तिन्ही सामाने गमविले होते.

Related Stories

आज बांबोळी स्टेडियमवर होणार ओडिशा – हैदराबाद यांच्यात लढत

Omkar B

दुसऱया वनडेत भारत अ संघ पराभूत

Patil_p

झिंबाब्वेच्या पहिल्या डावात 406 धावा

Patil_p

न्यूझीलंडला विजयाची संधी

Patil_p

कारच्या धडकेत वृद्ध ठार, क्रिकेटपटूला अटक

datta jadhav

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया

Patil_p
error: Content is protected !!