तरुण भारत

देशात 38,617 नवे कोरोना रुग्ण; 474 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 38 हजार 617 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 474 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 89 लाख 12 हजार 908 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 30 हजार 993 एवढी आहे.

मंगळवारी दिवसभरात 44,739 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 46 हजार 805 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 83 लाख 35 हजार 110 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 12 कोटी 74 लाख 80 हजार 186 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 9 लाख 39 हजार 279 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.17) करण्यात आल्या.

Related Stories

देशात 47,905 नवे कोरोना रुग्ण; 550 मृत्यू 

pradnya p

योगी आदित्यनाथ करणार गंगायात्रा

Patil_p

पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2734 वर 

pradnya p

धक्कादायक! गाडी थांबवायला गेलेल्या अधिकाऱ्यालाच नेले फरफटत

pradnya p

वाढत्या तापमानात घटते कोरोनाची शक्ती

Patil_p

अयोध्येत तयार होतेय श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती

datta jadhav
error: Content is protected !!