तरुण भारत

मध्यप्रदेशात लव्हजिहाद विरोधी कायदा येणार

5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद : स्वैच्छिक धर्मांतरासाठीही अट

वृत्तसंस्था/ भोपाळ

Advertisements

मध्यप्रदेशात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा आणण्यासंबंधी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मंगळवारी विधान केले आहे. मध्यप्रदेशात सातत्याने समोर येत असलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणांना रोखण्यासाठी सरकार कायदा आणणार आहे. धर्मस्वातंत्र्यासंबंधी सरकार कायदा लागू करणार असून याकरता आगामी विधानसभा अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे. कायदा लागू केल्यावर अजामिनपात्र कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला जाईल आणि 5 वर्षांची कमाल शिक्षा ठोठावण्यात येईल. यात आमिषे, प्रलोभने दाखविणे आणि भीती दाखविणे, धमकाविणे गुन्हा ठरणार असल्याचे मिश्रा म्हणाले.

लव्ह जिहादसारख्या प्रकरणांमध्ये सहकार्य करणाऱयांनाही मुख्य आरोपी करण्यात येणार आहे. त्यांना गुन्हेगार मानून मुख्य आरोपीप्रमाणेच शिक्षा होईल. विवाहासाठी धर्मांतर घडवून आणणाऱयांनाही शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात राहणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

एक महिनापूर्व अर्ज आवश्यक

स्वेच्छेने धर्मांतर करण्यासाठी एक महिन्यापूर्वी अर्ज करावा लागणार आहे. युवती  स्वेच्छेने धर्मांतर करून विवाह करू इच्छित असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. स्वेच्छेने धर्मांतर करून विवाह करू इच्छित असल्यास संबंधिताला एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱयांकडे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज न करताच धर्मांतर केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले आहे.

Related Stories

शेअर बाजार तीन वर्षाच्या नीचांकी स्थरावर घसरला

tarunbharat

पी.सी. चाको राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील

Patil_p

दिव्यांगांकरता नियमांमध्ये होणार बदल

Patil_p

एन.व्ही.रमण होणार नवे सरन्यायाधीश

Patil_p

समिती पुनर्रचनेची शेतकऱयांची मागणी

Patil_p

बिहार, उत्तर प्रदेशात वीज कोसळून 110 ठार

Patil_p
error: Content is protected !!