तरुण भारत

पुढील वर्षी जूनपर्यंत 50 ते 60 लाख जणांना रोजगार

बेंगळूर

 पुढील वषी जूनपर्यंत 50 ते 60 लाख जणांना रोजगार उपलब्ध करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत भारतातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Advertisements

कोरोना महामारीच्या काळात व्यवसाय उद्योगांना मोठा फटका बसला आहे. अनेकांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आली आहे तर अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये सुमारे 2 लाख जणांनी रोजगार गमावल्याची माहिती ईपीएफओच्या माहितीमधून समोर आली आहे. हे लक्षात घेता आत्मनिर्भर भारत रोजगार योजना प्रभावीपणे राबवून योग्य पात्र उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. जून 2021 पर्यंत 50 ते 60 लाख जणांना नोकऱया उपलब्ध करून दिल्या जातील, असे सरकारने म्हटले आहे. त्याची कार्ययोजना आखली जात असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

सनटेकच्या प्रकल्पांना तिमाहीत दमदार प्रतिसाद

Patil_p

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना 62 हजार कोटी वितरित

Patil_p

सलग दहाव्या दिवशीही तेजीची घोडदौड कायम

Omkar B

स्मार्ट टीव्हींच्या बाजारपेठेत रंगणार स्पर्धा

Patil_p

ओरियंट ग्रीन पॉवरला 6 कोटीचा नफा

Patil_p

हॉटेल उद्योगाचे 200 कोटी बुडाले

Patil_p
error: Content is protected !!