तरुण भारत

राजस्थान : दुसरे लग्न करण्यास नकार दिल्याने सासू सासर्‍यांनी कापले सुनेची जीभ व नाक

ऑनलाईन टीम / जैसलमेर : 


राजस्थानमधील जैसलमेरमधून एक धक्कादायक आणि माणुसकीला लाजवणारा प्रकार समोर आला आहे. एका 28 वर्षीय विधवा महिलेने नातेवाईकासोबत पुनर्विवाहाला नकार दिला म्हणून सासरकडच्या मंडळींनी तिचे नाक आणि जीभ कापून टाकली.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिलेचे सासू आणि सासरे तिचे एका नातेवाईकासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सुनेने पुनर्विवाह करण्यास नकार दिल्याने तिच्या सासू सासर्‍यांनी तिची जीभ व नाक कापून टाकले. दरम्यान, स्थानिक पोलीस अधिकारी कांता सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून सहआरोपींचा शोध घेतला जात आहे. 


जखमी महिलेचे सहावर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण लग्नानंतर वर्षभरातच तिच्या पतीचे निधन झाले. त्यांनतर सासरकडची मंडळी संबंधित महिलेला एका नातेवाईकासोबत लग्न करण्याचा दबाव आणत होती. 


याबाबत माहिती देताना पीडित महिलेच्या भावाने सांगितले की, माझ्या बहिणीने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर सासरकडच्या मंडळींनी आमच्या घरी येऊन माझ्या बहिणीवर हल्ला केला. आरोपींनी माझ्या बहिणीचे नाक आणि जीभ कापली. तिच्या उजव्या हातालाही मार लागला. माझी आई हल्लेखोरांपासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्यात ती सुद्ध जखमी झाली आहे. 


दरम्यान, जखमी महिलेवर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Stories

उत्तर बंगालची अर्थव्यवस्थेत मोठी हिस्सेदारी

Amit Kulkarni

हाफकिनला ‘कोवॅक्सिन’च्या उत्पादनास मंजुरी

datta jadhav

संजदच्या बैठकीपासून प्रशांत किशोर दूर

Patil_p

क्षयरोगाच्या उच्चाटनात हमिरपुर जिल्हा दुसरा; तर हिमाचल प्रदेश देशात तिसऱ्या स्थानावर

pradnya p

लॉकडाऊनचे निर्बंध कमी होत आहेत; आता ‘दो गज दूरी’ गरजेची

datta jadhav

रक्त गोठावणाऱ्या थंडीत 17 हजार फूट उंचीवर फडकावला तिरंगा

triratna
error: Content is protected !!