तरुण भारत

भाजपकडून पश्चिम बंगाल विधानसभेची तयारी; शाह, नड्डा करणार दर महिन्याला दौरा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

बिहार विधानसभा निवडणुकीत बहुमत सिद्ध केल्यानंतर भाजपने आता पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणूका संपेपर्यंत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दर महिन्याला बंगालचा दौरा करणार आहेत. 

बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यासंदर्भात बोलताना म्हणाले, पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. निवडणुकीपूर्वी पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी भाजपचे हे दोन्ही नेते दर महिन्याला वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करणार आहेत. आमच्या दोन्ही नेत्यांच्या नियमित भेटींमुळे पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे.  बिहारमध्ये विजयाची खात्री केल्यानंतर आता राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या बंगालवर भाजपचा भर आहे.  निवडणुकीत 294 पैकी 200 हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. 

Related Stories

विद्यार्थ्यांना मारहाण कोणत्या संस्कृतीत बसते?

Patil_p

हरियाणाचे विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांना कोरोनाची बाधा

pradnya p

जम्मू काश्मीर : जवानांनी उधळून लावला पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट

pradnya p

हेरगिरीसाठी सोडलेले पाकिस्तानातील कबुतर ताब्यात

datta jadhav

प्रयागराजमध्ये प्रियंका वड्रांचे धार्मिक स्नान

Amit Kulkarni

अयोध्या अन् साधू-संतांच्या छावण्या

Patil_p
error: Content is protected !!