तरुण भारत

पाक सैन्यात अल-कायदासमर्थकांचा भरणा

ओबामांच्या पुस्तकात दावा : पाक सैन्य-दहशतवाद्यांचे संबंध उघड गुपित, आयएसआयच्या कारवायांचा उल्लेख

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

पाकिस्तानच्या सैन्यात अल कायदा तसेच अन्य दहशतवादी संघटनांना मदत करणारे अनेक जण असून ही बाब आता कुणापासून लपून राहिलेली नाही, असे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ओबामा यांनी ही टिप्पणी >ए प्रॉमिस्ड लँड’ या स्वतःच्या पुस्तकात केली आहे. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेची माहिती पाकिस्तानला देण्यात आली असती तर मोहीम अयशस्वी ठरली असती, असे ओबामांनी पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले आहे.

पाकिस्तानी सैन्यात अल-कायदा, तालिबान आणि अन्य दहशतवादी संघटनांचे समर्थक आहेत हे आता उघड गुपित आहे. ही आघाडी किती धोकादायक ठरू शकते आम्ही सर्वजण जाणतो. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे (आयएसआय) अल कायदा आणि तालिबानशी थेट आणि जवळचे संबंध आहेत. आयएसआय या दहशतवादी संघटनांचा वापर भारत आणि अफगाणिस्तानच्या विरोधात करत असल्याचे ओबामांनी पुस्तकाद्वारे म्हटले आहे.

बायडेन यांचा होता विरोध

अमेरिकेच्या सील कमांडोंनी 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरात ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. ओबामांनीच या मोहिमेची वाच्यता जगासमोर केली होती. लादेनला मारण्यासाठी राबविण्यात आलेल्या गुप्त मोहिमेसंबंधी तत्कालीन उपाध्यक्ष ज्यो बायडेन (आताचे नियोजित अध्यक्ष) आणि संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स सहमत नव्हते, असा खुलासाही ओबामांनी केला आहे.

जोखिमयुक्त मोहीम

लादेनला ठार करण्याची मोहीम निश्चितच सोपी नव्हती, त्यात प्रचंड जोखीम होती, अबोटाबादमध्ये पाकिस्तानी सैन्याचा तळ होता आणि लादेनचा तेथील ठावठिकाणा अत्यंत सुरक्षित होता, परंतु आमच्याकडे ठोस माहिती आणि कार्ययोजना होती. छाप्याची अंतिम योजना तयार करण्याची सूचना पथकाला दिली होती, असे ओबामांनी पुस्तकात नमूद केले आहे.

हिलरीही साशंक

लादेन खात्म्याच्या मोहिमेवेळी हिलरी क्लिंटन विदेशमंत्री होत्या. या मोहिमेच्या यशाची शक्यता 51 टक्के होती. मोहीम अपयशी ठरल्यास याचे गंभीर परिणाम होणार असल्याचे बायडेन यांना वाटत होते. संरक्षण सचिवही हवाईहल्ल्याच्या बाजूने होते. मोहिमेनंतर अनेक विदेश नेत्यांशी चर्चा केली, परंतु त्या काळात पाकिस्तानचे राष्ट्रपती असलेले आसिफ अली झरदारी यांच्याशी चर्चा अवघड ठरली. परंतु त्यांनी माझे अभिनंदन करत बेनझीर भुट्टो यांना दहशतवाद्यांनी कशाप्रकारे ठार केल्याची आठवण करून दिली होती असे ओबामांनी नमूद केले आहे.

पाकवर विश्वास ठेवणे कठीण

आमच्यासमोर पर्याय होते, परंतु जोखीमही होती. राजनयिक संबंधही पणाला लागले होते. या योजनेचा सुगावा लागला असता तर ती अयशस्वी ठरण्याची शक्यता होती. याचमुळे अत्यंत निवडक लोकांनाच याची माहिती देण्यात आली. कुठल्याही योजनेत पाकिस्तानला सामील न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा अफगाणिस्तान सरकारला कमकुवत करु पाहते, तसेच भारताच्या विरोधात कट रचत असल्याचे ओबामा म्हणाले.

Related Stories

29 डिसेंबरला ऑक्सफोर्डच्या लसीला मंजुरी?

Patil_p

अध्यक्ष क्वारंटाइनमध्ये

Patil_p

अफगाणिस्तान : अभिनेत्री, पहिली महिला दिग्दर्शिका सबा सहरवर गोळीबार

datta jadhav

पत्नी मेलानियाही सोडणार ट्रम्प यांची साथ

datta jadhav

रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार

datta jadhav

बनावट वैमानिकांमुळे पाकिस्तानवर ओढवली नामुष्की

Patil_p
error: Content is protected !!