तरुण भारत

अभिनेत्री कंगना रणावतला पुन्हा समन्स

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंदेल हिला मुंबई पोलिसांनी तिसऱयांदा समन्स जारी केला आहे. यापूर्वी सातत्याने समन्स पाठवून देखील या दोघीही हजर राहिल्या नसल्याने पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स पाठविले आहे. दरम्यान, वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्हय़ात कंगनाला 23 तर रंगोली हिला 24 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या प्रकरणी चौकशीसाठी कंगनाला 26 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, दोघींनीही चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर, 10 नोव्हेंबर रोजी कंगनाला आणि रंगोली हिला 11 नोव्हेंबर रोजी हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण पुढे करत चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता.

Advertisements

याला म्हणतात स्वतरूच्या हाताने तोंडाला काळं फासणे

मुंबई पोलिसांकडून कंगनाला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत. कंगनाकडून अद्याप या समन्सला उत्तर देण्यात आले नाहीये.

सोशल मीडियावर कंगना राणावत हिने केलेल्या एका आक्षेपार्ह ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर यालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानुसार याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

‘कोरोना’च्या सावटाखाली विधेयकांचा पाऊस

Patil_p

‘राम’रंगी रंगला अयोध्येसह सारा देश

Patil_p

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

96 देशांची भारताच्या लसीला मान्यता

Patil_p

पाक पंतप्रधानानी मांडला होता भारताचा पहिला अर्थसंकल्प

Patil_p

दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये आणखी एका आठवड्याची वाढ

Rohan_P
error: Content is protected !!