तरुण भारत

दोन रस्ते अपघातात गुजरातमध्ये 15 ठार

वृत्तसंस्था / गांधीनगर

गुजरातमध्ये बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळय़ा अपघातात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बडोदा येथे वाघोडिया क्रॉसिंग महामार्गावर बुधवारी पहाटे 2 ट्रकमध्ये झालेल्या भीषण धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले. तसेच सुरेंद्रनगर जिल्हय़ातील कोठारिया गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनांबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बडोदा येथे झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या दुर्घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विट करत ‘बडोदाजवळ रस्ते अपघातामुळे मृत्यू झाल्याचे ऐकून दु:ख होत आहे. जखमींवर उपचार सुरू असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत. तसेच मृत्यू झालेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी मी प्रार्थना करतो’ असे म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

शेतकरी आंदोलनाला ‘सर्वोच्च ‘ब्रेक?

Patil_p

नव्या संसदभवनाच्या प्रकल्पाला संमती

Patil_p

‘ब्रह्मोस’चे युद्धनौकेवरून यशस्वी प्रक्षेपण

Patil_p

4 मित्रांनी सुरू केली ‘कपडय़ांची बँक’

Patil_p

चंदा कोचर यांच्या पतीला अखेर अटक

Patil_p

चांद्रयान-3, गगनयानसह 25 मोहिमांवर लक्ष्य

Patil_p
error: Content is protected !!