तरुण भारत

देशातील पहिले गो-कॅबिनेट मध्यप्रदेशात

गोधन संरक्षणासाठी गो-कॅबिनेटची निर्मिती

वृत्तसंस्था / भोपाळ

Advertisements

देशातील पहिले गो-कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय मध्यप्रदेश सरकारने घेतला आहे. ही कॅबिनेट गायींचे संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बुधवारी ट्विट करत माहिती दिली आहे.

पशूपालन, वन, पंचायत तसेच ग्रामीण विकास, महसूल, गृह आणि कृषी कल्याण विभाग गो-कॅबिनेटमध्ये सामील असणार आहेत. याची पहिली बैठक गोपाष्टमीच्या दिवशी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता गोअभयारण्य सालरिया आगर-मालवा येथे आयोजित करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात गो-कॅबिनेटची घोषणा  करणारे शिवराज सिंग आता त्याची निर्मिती करणार आहेत. शिवराज सरकारने गोमातेचे संरक्षण आणि संवर्धनासाठी काहीच केलेले नाही. याउलट काँग्रेस सरकारने चाऱयासाठी 20 रुपये प्रति गायीची केलेली तरतूदही कमी केल्याची टीका माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे.

Related Stories

यंदा जाणवणार कडाक्याची थंडी

Patil_p

सिंधियांना मिळणार रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी?

datta jadhav

के.के. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ वाढला

Patil_p

‘गोरखालँड’चा मुद्दा प्रथमच ठरला कमकुवत

Patil_p

कायदे मागे घेण्यासाठी सरकारला ‘अल्टिमेटम’

Patil_p

जीएसटी संकलन 1 लाख कोटींखाली

Patil_p
error: Content is protected !!