तरुण भारत

थिएमचा नदालला पुन्हा धक्का

लंडन : येथे सुरू असलेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत मंगळवारी तिसऱया मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला.

अतिशय दर्जेदार ठरलेल्या गुप लंडनमधील या सामन्यात चेल्याने गुरूपेक्षा सरस कामगिरी करीत 7-6 (9-7), 7-6 (7-4) अशी मात केली. प्रेक्षकांविना स्पर्धा खेळविली जात असल्याने काही पदाधिकारी, पंच व खेळाडूंच मैदानात दिसत होते. 18,000 प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये शंभरहून कमी लोक उपस्थित होते. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये एकही ब्रेकपॉईंट पहावयास मिळाला नाही. पण 27 वर्षीय थिएमने पहिल्या सर्व्हिसवर नदालपेक्षा जादा गुण मिळविले. नदाल व थिएम यांच्यात आतापर्यंत 14 सामने झाले असून नदालने 9 व थिएमने 5 वेळा विजय मिळविलेला आहे. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत थिएमने नदालला उपांत्यपूर्व फेरीत चार सेट्समध्ये हरविले होते. त्यातील तीन सेट्स टायब्रेकरपर्यंत लांबले होते आणि हे तीनही सेट्स थिएमनेच जिंकले होते. 

Related Stories

विंडीजला 32 वर्षांनंतर मालिकाविजयाची संधी

Patil_p

स्पेनचा नदाल शेवटच्या चार खेळाडूंत

Patil_p

कर्णधार ब्रेथवेट शतकाच्या समीप, विंडीज 7 बाद 287

Patil_p

अँजेलो मॅथ्यूजचे लंकन संघात पुनरागमन

Patil_p

भारतासाठी आज अस्तित्वाची लढत

Patil_p

राजस्थानचा स्मिथला, मुंबईचा मलिंगाला डच्चू

Patil_p
error: Content is protected !!