तरुण भारत

साईराज चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

बेळगाव : साईराज बिल्डर्स, डेव्हलपर्स पुरस्कृत, राजमुद्रा क्रिकेट क्लब मंडोळीच्या विद्यमाने आयोजित मंडोळी ग्रामीण साईराज चषक स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये ब्रम्हानंद स्पोर्टस् बिजगर्णी व कडोली इलेव्हन संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले.

सलामी लढतीत सॅन्डी स्पोर्टस् मंडोळी संघाविरुद्ध कडोलीने 42 धावांनी एकतर्फी विजय नोंदवला तर बिजगर्णी संघाने राजगोळी क्रिकेट संघाला 7 गडी राखून धूळ चारली. अन्य लढतीत साई एकता किणये संघाने ताडा इलेव्हन मण्णूरला, बिजगर्णीने येळ्ळूर स्पोर्टस् येळ्ळूरला तर कडोली संघाने साई एकता किणये संघावर विजय मिळवले.

तत्पूर्वी, उद्घाटन सोहळय़ात स्पर्धा पुरस्कर्ते महेश फगरे, गजानन फगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रारंभी नारायण दळवी, नारायण फगरे, संजय फगरे, प्रवीण हुंद्रे, यलाप्पा दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले गेले. त्यानंतर बाळासाहेब कणबरकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, सुरेश पाटील यांच्या हस्ते गणेश प्रतिमा पूजन, किरण पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. नारायण फगरे यांनी यष्टीपूजन केले. यावेळी आजी-माजी क्रिकेटपटू, पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

कर्नाटकाच्या विजयात पडिक्कलचे शतक

Patil_p

ऑस्टेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या क्वारंटाईनवेळी टेनिसपटूंना सरावाची मुभा

Patil_p

इंग्लीश महिला फुटबॉल हंगाम समाप्तीची घोषणा

Patil_p

विजय हजारे, जसू पटेल यांच्या कामगिरीचा सन्मान

Omkar B

पाकला धक्का : आशिया कपचे यजमानपद गेले

prashant_c

निदर्शक ऍथलिट्सना रोखले राष्ट्रपती भवनाच्या मार्गावर

Patil_p
error: Content is protected !!