तरुण भारत

महाविद्यालयांची गुणवत्ता वाढीसाठी ट्रिपल-ए ऑडिटची गरज

प्रतिनिधी / बेळगाव

महाविद्यालयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ट्रिपल-ए ऑडिटची नितांत गरज आहे, असे मत हुक्केरी येथील आर्ट्स ऍन्ड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य व राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे सदस्य डॉ. एस. एस. गवती यांनी व्यक्त केले.

Advertisements

भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय परीक्षणासाठी  आले असता ते बोलत होते. महाविद्यालयांनी आपले सामर्थ्य आणि उणीवा शोधण्यासाठी दरवषी असे ऑडिट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव प्रा. व्ही. ए. पाटील होते. डॉ. गवती यांच्यासमवेत खानापूर मराठा मंडळ कॉलेजचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर उपस्थित होते. प्राचार्य एस. एन. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. ए. एस. कुलकर्णी यांनी ट्रिपल-ए संदर्भात आपले विचार व्यक्त केले. डॉ. डी. एन. मिसाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आयक्मयुएसीचे समन्वयक प्रा. बी. आय. वसुलकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. एम. एस. पाटील यांनी केले.

Related Stories

कराड बाजार समितीची स्वागत कमान ढासळली

Patil_p

केएलईमध्ये मेंदूवर अवघड शस्त्रक्रिया

Amit Kulkarni

सीएनजी तुटवडा, रिक्षाचालकांचा खाडा

Amit Kulkarni

कोरोनासंदर्भात प्रक्षोभक माहिती प्रसारित केल्यास कारवाई

Patil_p

ऋषिकेश देसाई यांना पत्रकार संघाचा पुरस्कार

Patil_p

कलाकारांना व्यासपीठ देणारे अनोखे प्रदर्शन

Patil_p
error: Content is protected !!