तरुण भारत

शिक्षक बदली प्रक्रियेला हिरवा कंदील

गतवर्षी सक्तीच्या बदली अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना प्रथम संधी देण्याचा निर्णय

प्रतिनिधी / बेळगाव

शिक्षक बदली प्रक्रियेला हिरवा कंदील दाखविण्यात आला असून बदली प्रक्रियेबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळ गतवर्षी सक्तीच्या बदली अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना प्रथम संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  2020-2021 या शैक्षणिक वर्षातील बदली प्रक्रियेचे वेळापत्रक 11 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले असून यंदा सक्तीच्या बदली प्रक्रियेला बेक देण्यात आला  आहे. मात्र आदेशानुसार जनरल बदली, परस्पर बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

गतवर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून सक्तीच्या बदली प्रक्रियेतून 131 प्राथमिक शिक्षकांना तर 31 हायस्कूल शिक्षकांना सामोरे जावे लागले होते. यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त करत विरोध दर्शविण्यात येत होता. मात्र यंदाच्या बदली प्रक्रियेत सक्तीची बदली राबविण्यात येणार नसून असून जिल्हयातील रिक्त जागानिहाय बदली पार पडणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हयातून  बदली प्रक्रियेसाठी उत्सुक असणाऱया शिक्षकांनी अर्ज केले असून बदली प्रक्रियेचे परिपत्रक, कागदपत्रांची तपासणी तसेच कौन्सिलिंग, नियुक्ती प्रक्रिया याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे नूतन वर्षांपुर्वी बदली प्रक्रिया पुर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत
आहे.

रिक्त जागा तसेच बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांकडून करण्यात आलेले ऑनलाईन अर्ज, गतवर्षी सकतीच्या बदली प्रक्रियेला सामोरे गेलेले शिक्षक या बाबतची पडताळणी करुन बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे बदली प्रक्रियेला अखेर मुहुर्त मिळाला आहे. सध्या शाळा सुरु नसल्या तरी शिक्षकी सेवा बजाविताना आपली सोय विचारात घेऊन शिक्षक बदलीसाठी शिक्षकांकडून अर्ज करण्यात आले आहेत.

अन्याय झालेल्या शिक्षकांना न्याय

गतवर्षी सक्तीची बदली प्रक्रिया राबविण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध दर्शविण्यात आला. मात्र नियोजित वेळापत्रकानुसार सक्तीची बदली पार पडली होती. यामुळे शहरात सेवा बजाविलेल्या शिक्षकांची रामदुर्ग, सौंदत्ती तसेच खानापूर तालुक्यात बदली करण्यात आली होती. यावेळी शिक्षकांच्या अडचणीं तसेच गैरसोय याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. मात्र यंदाच्या बदली प्रक्रियेतून सक्तीच्या बदलीतून दूर सेवा बजाविणाऱया शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Related Stories

अकरा वर्षीय बालिकेवर बलात्कार

Rohan_P

संकेश्वर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

मारुती गल्ली, अनगोळ येथील कूपनलिका बंद

Amit Kulkarni

वापराविना लेझरटेक पार्क रुतले तलावाच्या गाळात

Patil_p

कापड दुकानामध्ये उडतोय सोशल डिस्टनंचा फज्जा

Patil_p

कोल्ड्रिंक्स चालकांनाही आर्थिक मदत करा

Patil_p
error: Content is protected !!