तरुण भारत

मासळीची आवक वाढली, दरांमध्ये घसरण

पोषक वातावरणाचा दर्याराजाला दिलासा

– मोठय़ा प्रमाणातील फिशमिलचाही आधार

प्रतिनिधी

रत्नागिरी

किनारपट्टीवर गेले काही दिवस चांगल्या वातावरणामुळे मच्छीमारांना समाधानकारक मासळी मिळत आह़े मासळीची आवक वाढताच दर काहीसे घसरल्याने खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  सध्याच्या हंगामामध्ये मोठी सुरमई (तवर) मच्छीमारांना मिळत आह़े बाजारामध्ये ही सुरमई 400 रुपये किलोने विक्री होत होत़ी मागील आठवडयामध्ये या सुरमईचा दर 500 रुपये प्रतिकीलो इतका होत़ा याच बरोबर सरंगाचीची देखील आवक होत असून 400 रुपये किलोने याची विक्री होत आह़े मासळी मोठय़ा प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे सर्व माशांच्या दरांमध्ये घसरण झाली आह़े कोलंबीदेखील 200 ते 500 रुपये किलोने विक्री केली जात आह़े

  मागील आठवयामध्ये जोरदार मतलयी वाऱयांमुळे मासेमारीला ब्रेक लागला होत़ा माशांची आवक घटल्याने मोठय़ा प्रमाणात दरवाढ झाली होत़ी मात्र समुद्र शांत झाल्यामुळे व हवामानही पोषक असल्याने मच्छीमारांना समाधानकारक मासळी मिळत आह़े पारंपरिक, गिलनेट, ट्रालिंगसह पर्ससीन मासेमारी करणाऱया नौकांना बोंबीलसह सुरमई, पापलेट काही प्रमाणात कोळंबी, बांगडे आदी मासळी मिळत आह़े पर्यटकही मिरकरवाडा बंदरावर मासळी खरेदीसाठी येत आहेत.

मासेमारी नौकांना मासळीसह फिशमीलही मोठय़ा प्रमाणात मिळत आह़े  सुरुवातीला मिळणाऱया फिशमीलला चांगला दर होत़ा मात्र आता मुबलक मिळणाऱया फिशमीला दर हा अंत्यत कमी मिळत असल्यामुळे मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केल़ी पर्ससीन मासेमारी कालावधी डिसेंबरअखेर समाप्त होणार आह़े  मात्र मागील काही दिवसांमध्ये मिळणाऱया घोळ, सुरमई व पापलेट आदी निर्यातक्षम मासळीमुळे पर्ससीन नौकांना हा हंगाम दिलासादायक गेल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े.

Related Stories

गणपतीपुळेतील समुद्रात बुडणाऱ्या पाच जणांना वाचवण्यात यश; एक गंभीर

Shankar_P

मेर्वी परिसरात हल्लेखोर बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

Shankar_P

संगणकीकृत सातबारा उतारावर तलाठी सहीची गरज नाही

Patil_p

दापोली : गव्हे येथे तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

triratna

संगमेश्वरजवळ कारची कंटेनरला समोरासमोर धडक, महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

triratna

रत्नागिरी : दापोली पाजपंढरी बससेवा ७ महिन्यांनी पून्हा सुरु

triratna
error: Content is protected !!