तरुण भारत

मुंबई हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईदला 10 वर्षाचा कारावास

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 


मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने बेकायदेशीर निधी प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सईदला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे आणि अमेरिकेने त्याच्यावर 10 कोटी डॉलर्सचे बक्षिसही ठेवले आहे.

Advertisements

गेल्या वर्षी 17 जुलैला दहशतवादी फंडिंग प्रकरणात हाफिज सईदला अटक करण्यात आली होती. यावर्षी फेब्रुवारीमध्ये दहशतवादविरोधी कोर्टाने त्याला 11 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. सध्या तो लाहोरच्या उच्च सुरक्षा कोट लखपत कारागृहात बंद आहे.


लाहोर कोर्टातील एका अधिकाऱ्याने म्हटले की, लाहोरच्या दहशतवादविरोधी कोर्टाने (एटीसी) गुरुवारी जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज सईदसह चार जणांना शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टाने जमात-उद-दावाच्या प्रवक्त्याला टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणात 32 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. टेरर फंडिंगच्या प्रकरणात कोर्टाने सईदच्या नातेवाईकासह जमात-उद-दावाच्या इतर दोन नेत्यांनाही दोषी ठरवले.

दहशतवादविरोधी कोर्टाचे न्यायाधीश एजाज अहमद बट्टर यांनी जमात-उद-दावाचे प्रवक्ते याह्या मुजाहिदला दोन प्रकरणात 32 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, असे एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.


त्याचबरोबर प्रोफेसर जफर इक्बाल आणि प्रोफेसर हाफिज अब्दुल रहमान मक्कीला (सईदचा नातेवाईक) दोन प्रकरणात अनुक्रमे 16 आणि एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Related Stories

लस उपलब्ध झाल्यास देशवासियांना मोफत डोस; ‘या’ देशाने केली घोषणा

datta jadhav

अफगाणिस्तानच्या मुद्दयावर सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात

Abhijeet Shinde

चिनी शेअरबाजाराचा 13 वर्षांमधील नीचांक

Patil_p

अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिला संशोधकाची हत्या

datta jadhav

अफगाणिस्तान : कंदहारमध्ये 175 तालिबानींना कंठस्नान

datta jadhav

कोल्हापुरात कोरोनाचा पहिला बळी; इचलकरंजीच्या वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!