तरुण भारत

वाईतील सोने – चांदी व्यापाऱ्याने केली आत्महत्या

प्रतिनिधी / सातारा

वाई येथील लक्ष्मी नारायण मार्केटमध्ये सोने चांदीचा व्यापार करणारे व्यापारी प्रमोद सुरेश ओसवाल (वय 34) यांनी घरगुती कारणावरून घरातच आज सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महेश सुरेश ओसवाल यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांचा भाऊ प्रमोद सुरेश ओसवाल यांनी घरातच आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण पत्नी माहेरी गेलेली परत येत नाही असे म्हटले आहे. प्रमोद ओसवाल यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत वाई पोलिसांना विचारणा केली असता पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार धायगुडे यांनी कारण देत माहिती दिली नाही.

Advertisements

Related Stories

शेंद्रे ते कागल महामार्गाच्या सहा पदरीकरणास ‘बीओटी’ वर लवकरच सुरूवात…

Patil_p

वाढीव वीज बिलाविरोधात कंदील भेट आंदोलन

datta jadhav

राष्ट्रवादी पॅनेलबाबत पवार साहेब घेणार बैठक

Patil_p

सांगली : जतमध्ये भांडण सोडविणाऱ्यावर चाकूने वार

Abhijeet Shinde

सातारा : तोतया ‘रॉ’ एजंटची पोलिसांनी केली उचलबांगडी

datta jadhav

जिवंत बॉम्बचे स्थानिक कनेक्शन?

Amit Kulkarni
error: Content is protected !!