तरुण भारत

कृष्णा पात्रातील दोन दुर्मिळ हरणटोळ सापास जीवदान

उदगांव / वार्ताहर

उदगांव येथील कृष्णा नदी पात्रातून दोन दुर्मिळ हरणटोळ साप वाहुन जात असताना वाईल्ड लाईफ कझवेंशन अ‍ॅण्ड रेस्क्यू सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी पकडून त्यास जीवदान दिले. त्यानंतर वनविभागाच्या उपस्थित या दुर्मिळ सापांना नैसर्गिक भागात सुरक्षित सोडण्यात आले.
उदगांव येथील कृष्णा नदीच्या पात्रात रेल्वे पुलाजवळ दोन हरणटोळ जातीचे साप वाहुन जात असल्याचे येथील नागरिकांनी वाइल्ड लाईफला दिली तत्काळ वाईल्ड लाईफ कझवेंशन अ‍ॅण्ड रेस्क्यू सोसायटीचे प्राणीमित्र शुभम रास्ते, अभिजित खामकर, श्रेयश धुमाळ, उबेद जमादार, साकिप मुजावर, शहारुख मुजावर यांनी नदीकाठी येऊन पोहत जावून या दुर्मिळ सापाना सुरक्षित पकडून जिवदान दिले. हरणटोळ हा साप दुर्मिळ असून तो निमविषरी आहे. त्यांचा रंग दाट हिरवा तर शरीराच्या लांबीपेक्षा जाडी खुप कमी असते.

Advertisements

डोके लांबट त्रिकोणी व टाकेदार डोळयाच्या बाहुल्या असुन हा घनदाट जंगलात आढळतो. वाईल्ड लाईफच्या पदाधिकारी व वन विभागाचे गजानन संकट यांनी या सांपाना नैसर्गिक वातावरणात सुरक्षित ठिकाणी सोडले.

Related Stories

तासगावात एकाच दिवशी 70 जण कोरोनामुक्त

triratna

आष्ट्यात बापलेकास मारहाण : चौघांवर गुन्हा नोंद

triratna

‘पडळकर हे मनोरुग्ण, तेच भाजपची माती करणार’

triratna

सांगली : प्रभाग समित्यांची फेररचना चुकीची – ॲड.अमित शिंदे; नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवणार

triratna

सांगलीचे वनाधिकारी प्रमोद धानके यांची ठाणे येथे बदली

triratna

सांगली जिल्ह्यात 827 कोरोनामुक्त, नवे 607 रूग्ण

triratna
error: Content is protected !!